Homeचिट चॅटडॉ. सुचिता पाटील...

डॉ. सुचिता पाटील यांचा ‘झाले जलमय’ प्रकाशित

सर्वद फाउंडेशन आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय सर्वद साहित्य संमेलनात डॉ. सुचिता पाटील यांच्या `झाले जलमय’ या कथासंग्रहाचे शानदार प्रकाशन करण्यात आले. मुंबईत नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात शिक्षणतज्ञ महादेव रानडे, कवी अशोक बागवे, सतिश सोळांकूरकर, अरुण म्हात्रे, सनदी अधिकारी हर्षवर्धन जाधव, साहित्यिक डॉ. माधव अभ्यंकर, पत्रकार अशोक शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शारदा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या प्रा. पाटील यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील कथा सत्य घटनांवर आधारित आहेत. पुस्तक विक्रीतून येणारे सर्व पैसे गरीब विद्यार्थ्यांसाठी सर्वद फाउंडेशनला देणगी स्वरुपात दिले जाणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी जाहीर केले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content