Homeपब्लिक फिगरडॉ. ज्योती वाघमारे...

डॉ. ज्योती वाघमारे महाराष्ट्राच्या प्रचार व प्रसार समन्वयक

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचविणे, त्यासाठी प्रभावी प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. डॅा. ज्योती वाघमारे यांची मुंबईत मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात राज्य प्रचार व प्रसार समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रा. डॅा. ज्योती वाघमारे यांची दीड वर्षांपूर्वी शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ध्येयधोरणांची प्रभावीपणे मांडणी करुन राज्यभर पक्षाचे प्रचारकार्य जीव ओतून केले आहे. विरोधकांना सडेतोड उत्तर देऊन त्यांनी राज्यातील महायुती सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राज्यभर प्रचाराचा झंझावात केला. या काळात त्यांनी राज्यात ५३ सभा घेतल्या. त्यांची कामगिरी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची राज्य शासनाच्या प्रचार व प्रसार समन्वयकपदी नियुक्ती केली आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत जनतेच्या विकासासाठी योजना राबविण्यात येतात. मात्र, त्या कल्याणकारी योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे कित्येक लोकांना त्या योजनांपासून वंचित राहवे लागते. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती, त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत शासन आपल्या दारी व मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रा. डॅा. ज्योती वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी झालेल्या दसरा मेळाव्यात प्रा. डॅा. वाघमारे यांच्या भाषणामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला होता. आता त्यांच्यावर राज्याच्या प्रचार व प्रसार समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे सोलापूरच्या लौकिकात भर पडली आहे.

Continue reading

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...

शरद पोंक्षेंच्या विधानाने खळबळ, भाजपाई अस्वस्थ!

प्रखर हिंदुत्ववादी विचार आणि सावरकरभक्तीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. "मी भाजपसारखे दहा पक्ष उभे करू शकतो," असे खळबळजनक विधान पोंक्षे यांनी केल्यामुळे राजकीय...

खेडच्या सणघरमध्ये माजी सैनिकाचा संशयस्पद मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सणंघर गाव! तालुक्यापासूनदूरवर शांत गाव, आजूबाजूला हिरवी झाडे-झूडपे, वस्ती बहुतेक मोरे मंडळींची, इकडेही मोरे आणि तिकडेही मोरेच! घरे मध्यम आकाराची पण प्रशस्त. या मोरे वस्तीचे विशेष म्हणजे जणू सर्वच मोरे सरकारी नोकर, कुणी पोलीस खात्यात...
Skip to content