Homeचिट चॅटविश्व गुजराती समाजाच्या...

विश्व गुजराती समाजाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी डॉ. हेमराज शाह

मुंबईतले गुजराती समाजाचे अध्वर्यू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. हेमराज शाह यांची विश्व गुजराती समाजाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विश्व गुजराती समाजाचे अध्यक्ष सी. के. पटेल यांनी डॉ. शाह यांना विश्व गुजराती समाज उपाध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र पाठविले आहे.

विश्व गुजराती समाजाच्या स्थापनेपासून आपण या संस्थेशी जोडले गेले आहात आणि समाजाची स्थापना तसेच संस्थेची प्रगती होण्यात आपले योगदान महत्त्वपूर्ण आहे. विश्व गुजराती समाजाचे वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने संस्थेचा विस्तार, विविध गुजराती संस्था, संघटना यांच्यासमवेत समन्वय ठेवण्याची, इतकेच नव्हे तर गुजरात राज्याबाहेर या संस्थेची प्रगती घडविण्याची जबाबदारी आपण यशस्वी पणे पार पाडाल, असा विश्वास पटेल यांनी या नियुक्तीपत्रात व्यक्त केला आहे.

डॉ. हेमराज शाह गेल्या २५ वर्षांपासून गुजराती समाजासाठी कार्यरत आहेत. १९९६ साली प्रख्यात उद्योगपती मुकेश पटेल यांच्यासमवेत मुंबईमध्ये विश्व गुजराती समाजाच्या दुसऱ्या परिषदेचे त्यांनी यशस्वीपणे आयोजन केले होते. ही परिषद तीन दिवस चालली होती. सुमारे तीस हजार गुजराती बांधवांची उपस्थिती या परिषदेला लाभली होती. सुमारे १५ वर्षे महाराष्ट्र गुजराती साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यपदाचेही डॉ. शाह यांनी काम पाहिले आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरणाच्या मुंबई रिपेअर बोर्डाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content