Wednesday, January 15, 2025
Homeपब्लिक फिगरविजयाचा उन्माद नको...

विजयाचा उन्माद नको तर पराभवाने खचू नका!

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असते. त्यामुळे निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. त्याला जपले गेले पाहिजे. आता विधानसभा निवडणुका समोर आहेत. त्यावर लक्ष केंद्रीत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत आज केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मुंबईतल्या गरवारे क्लब हाऊस येथे झाली. त्यावेळी पवार बोलत होते. येत्या विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जाणार असून त्यानुसार पक्षसंघटनेची बांधणी करायची असल्याचेही त्यांनी सांगितले.

उन्माद

येत्या १० जूनला राष्ट्रवादीचा २५वा वर्धापनदिन असून यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवविले जातील. अल्पसंख्याक समाजासाठी सर्वाधिक चांगले निर्णय महायुती सरकारच्या काळात घेतले गेले आहेत. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा आपल्या पक्षाचा मूळ गाभा असून कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही ही विचारधारा सोडणार नाही, अशी भूमिका अजितदादांनी मांडली.

येणारी विधानसभा निवडणूक आपणा सर्वांसाठी महत्त्वाची असून त्यावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाचा विस्तार देशभरात करायचा निर्धार कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

उन्माद

अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली जो आम्ही सर्वांनी अभूतपूर्व निर्णय घेतला, त्यावर महाराष्ट्राची जनता १०० टक्के शिक्कामोर्तब करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात वैचारिक पातळी खालावलेली दिसली. मात्र, प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी कोणाविषयी टीकाटिप्पणी करताना मर्यादा ओलांडली नाही, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागून त्यादृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर द्यावा आणि सर्वांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले.

उन्माद

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content