Homeटॉप स्टोरीबनावट व्हिडिओ फॉरवर्ड...

बनावट व्हिडिओ फॉरवर्ड करू नका! कायदा कडक आहे!!

विरोधकांना प्रचारासाठी मुद्दे सापडत नसल्याने आता आरक्षणाच्या मुद्द्यावर अपप्रचार सुरू झाला असून सध्या भाजपाच्या अनेक नेत्यांच्या आवाजात, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून बदनामीकारक व खोटी वक्तव्ये प्रसृत केली जात आहेत. अशा अपप्रचारापासून समाजाला वाचविण्यासाठी सावध राहा व असे व्हिडिओ समाजमाध्यमांवर दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या. ते इकडेतिकडे फॉरवर्ड करू नका. कायदा कडक आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिला.

सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कराड येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. या सभेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले, भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि महाराजांच्या नौदलाच्या शक्तीविषयी संपूर्ण जगाला आदर आहे, पण गुलामगिरीच्या मानसिकतेत गुरफटलेल्या काँग्रेसने मात्र, भारतीय नौदलाच्या झेंड्यावरील ब्रिटीशांचे चिन्ह स्वातंत्र्यानंतरही बदलले नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नौदलाच्या ध्वजावर छत्रपतींचे मानचिन्ह विराजमान झाले. याच काँग्रेसकडून ओबीसी, दलित, आदिवासी समाजाला घटनेने दिलेल्या आरक्षणाला धोका निर्माण केला जातो आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सातारा ही वीरांची भूमी आहे. या भूमीतील जनतेला आज देशाच्या लष्करी शक्तीचा निश्चितच अभिमान वाटत असेल, कारण आता लष्कराकडे मेड इन इंडिया शस्त्रे आहेत. यामुळेच शस्त्रांच्या दलालांची दुकाने बंद झाली असून विरोधकांची हीच पोटदुखी आहे. देशाच्या अभिमानाला, अस्मितेला आणि एकतेला शक्ती देण्याची ग्वाही मी सत्तेवर आलो तेव्हा जनतेला दिली होती आणि आता ती पूर्ण केली आहे. आपल्या सरकारने सैन्यदलात वन रँक वन पेन्शन योजनाही लागू केल्याचा उल्लेखही मोदी यांनी केला. महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणांना तसेच देशभरातील सर्व किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्याचे काम सुरू आहे, असेही ते म्शीहणाले.

भारतीय राज्यघटनेने धर्माच्या नावावर आरक्षणास मनाई केली असताना काँग्रेसने मात्र, एका रात्रीत मुस्लिमांचा समावेश ओबीसी यादीत करून त्यांना ओबीसी आरक्षण बहाल केले आणि आता घटनेत बदल करून हीच नीती त्यांना संपूर्ण देशात राबवायची आहे. पण जोवर मोदी जिवंत आहेत, आणि जोवर मोदींना जनतेचा आशीर्वाद आहे, तोवर काँग्रेसचा हा कट यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा इशारा मोदी यांनी दिला.

त्याआधी सोलापूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर विजय संकल्प सभेतही मोदी यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर देत काँग्रेसला झोडपले. या निवडणुकीत जनता पुढच्या पाच वर्षांकरिता विकासाची गॅरंटी निवडणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. विजय देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. समाधान अवताडे, नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.

आता बाबासाहेबही घटना बदलू शकत नाहीत!

सत्ता मिळाल्यास पाच वर्षांत पाच पंतप्रधान देण्याचा नवा फॉर्म्युला काँग्रेस आघाडीने काढला आहे. इंडी आघाडीला देश चालवायचा नसून केवळ मलई चाखायची आहे, असा आरोपही त्यांनी केला. मागील दहा वर्षांत सामाजिक न्यायासाठी सरकारने जेवढे काम केले, तेवढे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या काळात कधीही झाले नाही. आरक्षण अधिकाधिक मजबूत करण्यासाठी मी बांधील आहे. त्यामुळेच भाजपा सरकार घटना बदलणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. आताच्या स्थितीत खुद्द बाबासाहेब आंबेडकरांना वाटले असते तरी आज ते घटना बदलू शकले नसते. मी तर बदलू शकणारच नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content