Homeहेल्थ इज वेल्थदादरचे बाई गुलबाई...

दादरचे बाई गुलबाई आरोग्यकेंद्र पुन्हा मूळ ठिकाणी

मुंबईतल्या जी उत्तर विभागातील दादर येथील बाई गुलबाई आरोग्यकेंद्र व दवाखाना अन्य ठिकाणी काही कारणाने तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात आला होता. आता हा दवाखाना मूळ ठिकाणी म्हणजे अमृत महोत्सव इमारत, पहिला मजला, एन. सी. केळकर मार्ग, दादर याठिकाणी कालपासून, १५ एप्रिलपासून पुन्हा कार्यान्वित करण्यात आला आहे.

आरोग्यकेंद्र

जी उत्तर विभागातील बाई गुलबाई आरोग्य केंद्र व दवाखाना २१ जून २०१३ रोजी दादर येथील सद्गुरू हाईट्स, तळमजला, भवानी शंकर मार्ग, दादर येथे स्थलांतरीत करण्यात आला होता. मूळ जागेवरील इमारत पूर्ण झाल्यानंतर हा दवाखाना आता मूळ ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे. जी उत्तर विभागातील नागरिकांनी या आरोग्य केंद्र व दवाखान्यातून देण्यात येणाऱ्या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे. 

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content