Homeचिट चॅटदादर केटरिंग कॉलेजला...

दादर केटरिंग कॉलेजला 70 वर्षे पूर्ण!

मुंबईतील दादर केटरिंग कॉलेजला (इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका गौरवशाली सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात संस्थेचे माजी विद्यार्थी ॲनाबेल रॉड्रिग्स (1985 तुकडी) आणि डॉ. नितीन शंकर नागराळे (1995 तुकडी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दादर केटरिंग कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या अधिकृत संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. आठवणींचा खजिना असलेले एक संकेतस्थळदेखील दादर केटरिंग कॉलेजच्या आजवरच्या वाटचालीचा उत्सव आहे. दादर केटरिंग कॉलेज हे आशियातील पहिले महाविद्यालय आहे ज्याने आदरातिथ्य अध्यापनाची 70 वर्षे पूर्ण केली आहेत.

या कार्यक्रमादरम्यान “डेलीकेसीज ऑफ ख्रिसमस” या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी – शेफ व्ही के अय्यर (1980 तुकडी), शेफ मनोज वसईकर (1985 तुकडी) आणि शेफ शॅनन लॉरेन्स (2010 तुकडी) यांनी या पाककला स्पर्धेत परिक्षक म्हणून काम केले. शेरॉन डिसोझा यांना आपल्या पाककला कलात्मकतेसह स्पर्धेत प्रथम क्रमांक, मारिया गोम्स यांना स्वादिष्ट पाककृतीद्वारे द्वितीय क्रमांक तर श्रुती फाटक यांनी उल्लेखनीय सादरीकरणासाठी तिसरा क्रमांक पटकावला.

यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरेल गायन सादर केले आणि अनेक उत्साही नृत्याविष्कार सादर केले.

जमलेल्या सर्वांच्या आनंदासाठी कार्यक्रमस्थळी हस्तकला नमुने आणि ख्रिसमस मिठाईसह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि पेये असलेले स्टॉल्स देखील लावण्यात आले होते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content