Homeब्लॅक अँड व्हाईटकोट्यवधींचा जीएसटी बुडवणाऱ्या...

कोट्यवधींचा जीएसटी बुडवणाऱ्या दांपत्याला अटक

कर चुकवेगिरी प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा नुकताच उघडकीस आणला आहे. बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत कमलेश बाबुलाल जैन (वय ६१) आणि भावना कमलेश जैन (वय ६१) या दोन संचालकांना काल अटक करण्यात आली, अशी माहिती राज्य कर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांनी दिली.

मे. मोनोपोली इनोव्हेशन्स प्रा.लि. या कंपनीविरोधात वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरू करण्यात आली होती. कारवाईदरम्यान या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी व विक्री दाखवून ६.४० कोटी रुपयांची महसूल हानी केल्याचे दिसून आले. या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवून ३.२३ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट घेऊन तसेच मालाशिवाय फक्त बिले देऊन ३.१७ कोटी रुपयांची शासनाची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आले.

जीएसटी

महानगर दंडाधिकारी न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ही धडक कारवाई राज्य कर सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डी. के. शिंदे यांनी राबविली. या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्त्वाचे योगदान राहिले.

सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे २०२४-२५ या आर्थिक वर्षात पहिल्याच अटक कारवाईद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content