Homeएनसर्कलकोरोनाग्रस्तांसाठी आता केंद्राची...

कोरोनाग्रस्तांसाठी आता केंद्राची रूग्णालयेही मिळणार!

देशातल्या विविध राज्यांत तसेच केंद्रशासित प्रदेशांतला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधल्या केंद्रीय मंत्रालयांनी आणि त्यांच्या सार्वजनिक उपक्रमांनी त्यांच्या रुग्णालयांतील खाटा कोरोना रूग्णांसाठी समर्पित करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

देशातील अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात गेल्या काही आठवड्यांपासून कोविड-19च्या (कोरोना) रुग्णांमध्ये आणि मृत्यूंमध्ये वाढ नोंदविली जात आहे. ‘संपूर्ण शासन’ या दृष्टिकोनासह, कोविड व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद उपायांसाठी राज्यांना कृतीशीलपणे पाठिंबा देण्याच्या सहयोगी धोरणानुसार, केंद्र सरकार कोविड-19 विरोधातल्या लढ्याचे नेतृत्त्व करीत आहे. या प्रतिसादाचा एक भाग म्हणून, परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्याच्या दृष्टीने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यासाठी, भारत सरकारची अनेक मंत्रालये, अधिकारप्राप्त गट आणि सचिव संघटना एकत्रितपणे काम करत आहेत.

देशभरातील कोविड-19च्या गंभीर रुग्णांच्या प्रभावी  वैद्यकीय व्यवस्थापनासाठी, रुग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना म्हणून, सर्व केंद्रीय मंत्रालयांनी त्यांच्या नियंत्रणाखाली असलेली रुग्णालये किंवा सार्वजनिक उपक्रमांनी कोविड उपचारांसाठी गेल्या वर्षाप्रमाणे विशेष समर्पित रुग्णालय विभाग किंवा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विभाग स्थापन करण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

या रुग्णालयांमध्ये/विभागांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने, पुष्टी झालेल्या कोविड-19 रुग्णांची विशेष काळजी घेऊन उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, स्वतंत्र प्रवेश आणि बाह्यगमन मार्ग असावेत. या व्यतिरिक्त, ऑक्सिजनची  सोय असेलल्या  खाटा, आयसीयू खाटा, व्हेंटिलेटर आणि गंभीर रुग्णांसाठी विशेष अतिदक्षता विभाग (जिथे उपलब्ध असेल तिथे), प्रयोगशाळा सेवा, शारीरिक अवयवांची प्रतिमा काढण्याची सेवा, स्वयंपाकघर, कपडे धुऊन मिळण्याची व्यवस्था इत्यादीसह सर्व सहाय्यक आणि पूरक सेवा प्रदान करण्यासाठी हे समर्पित रुग्णालय वॉर्ड्स किंवा विभाग सुसज्ज असावेत, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशभरात कोविड-19 रुग्णांमध्ये अचानक झालेल्या वाढीमुळे उद्भवलेल्या परिस्थतीत, गेल्या वर्षाप्रमाणेच सर्व केंद्रीय मंत्रालये/विभाग आणि त्यांच्या सार्वजनिक उपक्रमांनी तसेच त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांनी सहाय्य्यकारी कृतीशील पाठिंबा द्यावा, असा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व केंद्रीय मंत्रालयांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

या रुग्णालय वॉर्ड/विभागांमध्ये लोकांना आवश्यक उपचारांचा लाभ मिळावा या दृष्टीने, जिथे ही रुग्णालये आहेत ती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे संबंधित आरोग्य विभाग आणि राज्ये/जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्याशी योग्यप्रकारे समन्वय साधून अशा समर्पित रुग्णालय वॉर्डांचा तपशील सार्वजनिक करावा, असेही या आदेशांत म्हटले आहे. संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी आवश्यक समन्वय साधण्यासाठी मंत्रालय/विभागातून नोडल अधिकारी नेमला जाऊ शकतो आणि त्याचे संपर्क तपशील संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला द्यावेत, असेही सांगण्यात आले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content