Homeचिट चॅटकाँग्रेस सेवादल सुरू...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला.

पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे निवृत्त उपकुलसचिव तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदेश काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे तसेच कॅप्टन निलेश पेंढारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर शिबिराधीपती रविंद्र म्हसकर यांनी शिबिरार्थींना सेवादलाची कार्यप्रणाली यावर अतिशय सविस्तर प्रशिक्षण दिले. संध्याकाळी शिबिराथींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराच्या स्थळापासून मर्सिस, मुक्ताअळी, दिघोळे, घरतवाडी, होळी भाजी मार्केट, तरकड ग्रामपंचायत, आकटण, वासळई या भागातून आणि गावातून संविधान सन्मान जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. तरकड ग्रामपंचायतच्या उपसरपंच सुनीता लिमॉस यांनी मान्यवरांचे आणि पदयात्रेचे स्वागत केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ पदयात्रेत सहभागी झाले होते. प्रभातफेरीनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रशिक्षण सेलचे अध्यक्ष आशितोष शिर्के यांनी “मजबुतीका का नाम गांधी” या विषयावर अतिशय मार्मिक मार्गदर्शन केले तसेच राजेंद्र भिसे यांनी “आजची राजकीय आव्हाने आणि सेवादलाच्या महत्त्वाची भूमिका” या विषयावर मार्गदर्शन केले.

शिबिराच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेवादलात नवीन कार्यकर्ते तयार होऊन त्यांनी संविधान बचाव आणि सन्मानाचा विचार घेऊन गावोगावी आणि घरोघरी जावे, असे आवाहन केले. याशिवाय काँग्रेस पक्ष निर्मितीचा इतिहास ते विद्यमान परस्थितीत सेवादलाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी यावर अतिशय चिंतनशील मनोगतही त्यांनी व्यक्त केले. शिबिरार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आणि राष्ट्रगानाने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी, प्रकाश पेवेकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल, मोहन घरत, डॉमिनिक डिमेलो, रुपेश रॉड्रिक, प्रिन्स्ली घोंसालविस, सुनील यादव, किरण शिंदे आदी मान्यवरांची शिबिरात उपस्थिती होती.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content