Homeडेली पल्सकाँग्रेसनेच डॉ. आंबेडकरांना...

काँग्रेसनेच डॉ. आंबेडकरांना पराभूत केले होते..

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर देशाचे संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे. मात्र कुणी कितीही  प्रयत्न केले तरीही ते अशक्य असल्याचे खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच आपल्या भाषणातून स्पष्ट केले आहे. याउलट असा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते याची आठवण शिवसेनेचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज करून दिली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मुंबईतल्या दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केले. तसेच चैत्यभूमीच्या आवारात भरवलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाला अनुसरून राज्याचा कारभार सुरू आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला आहे. राज्य शासनानेही इंदू मिलच्या जागी भव्य स्मारक उभे करायला सुरुवात केली आहे. नागपूरमधील दीक्षाभूमीचे जतन, संवर्धन यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करून शासनाने बाबासाहेबांना खरी मानवंदना दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला आहे. राज्यातदेखील हा दिवस आपण साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ आरपीआय नेते अविनाश महातेकर आणि नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content