Friday, December 27, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजभारतातल्या कम्युनिटी रेडिओला...

भारतातल्या कम्युनिटी रेडिओला झाली 20 वर्षे!


भारतातील कम्युनिटी रेडिओची 20 वर्षे साजरी करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आज तसेच उद्या म्हणजेच 13 आणि 14 फेब्रुवारीला चेन्नईच्या अण्णा विद्यापीठात प्रादेशिक कम्युनिटी रेडिओ संमेलन (दक्षिण विभाग) आयोजित करण्यात आले आहे. देशाच्या दक्षिण भागातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असलेली सर्व 117 कम्युनिटी रेडिओ स्थानके या संमेलनात सहभागी होणार आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे यावेळी बीजभाषण होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन उपस्थितांसमोर विशेष भाषण करणार आहेत. या प्रादेशिक कम्युनिटी रेडिओ संमेलनात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री या क्षेत्राला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या काही धोरणात्मक बदलांविषयी घोषणा करतील अशी शक्यता आहे.

कम्युनिटी रेडिओचा भारतातील प्रवास 2002मध्ये सुरु झाला. त्यावेळी आयआयटीज तसेच आयआयएम्स काही प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांना कम्युनिटी रेडिओ स्थानके सुरु करण्यासाठी परवाने देण्यासंदर्भातील धोरणाला भारत सरकारने मंजुरी दिली. कम्युनिटी रेडिओ हा त्या-त्या समुदायाचे प्रतिनिधित्व करत असतो हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने नागरी संस्था तसेच स्वयंसेवी संस्था यासारख्या विनानफा संस्थांना या धोरणाच्या कक्षेत आणण्यासाठी या धोरणाचा पाया अधिक विस्तारण्याचा निर्णय सरकारने घेतला जेणेकरून विकास तसेच सामाजिक बदल यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर नागरी समाजाला जास्त प्रमाणात सहभागी होता यावे. परिणामस्वरूप, भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी 1 फेब्रुवारी 2004 रोजी भारतातील पहिल्या कम्युनिटी रेडिओ स्थानकाचे उद्घाटन केले. इतर समुदायाधारित संस्थांनादेखील कम्युनिटी रेडिओ केंद्रे सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर, आधी कमी वेगाने सुरू झालेल्या या प्रवासाने चांगलीच गती घेतली.

रेडिओ

गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरु करण्यासाठीच्या अर्जांच्या सादरीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यासह या क्षेत्रात काम करण्यातील सुलभता आणण्यासाठी, अनेक सक्रीय पावले उचलली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत नव्याने सुरु झालेल्या 155 केंद्रांसह देशात कार्यरत कम्युनिटी रेडिओ केंद्रांची संख्या आता 481वर पोहोचली आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये या क्षेत्राचा लक्षणीय विकास झाला असून वर्ष 2014मध्ये कार्यरत असलेल्या 140 कम्युनिटी रेडिओ केंद्रांची संख्या वाढून वर्ष 2023मध्ये 481 पर्यंत वाढली आहे. आज ‘जागतिक  रेडिओ दिना”निमित्त प्रादेशिक संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

कम्युनिटी रेडिओ हा सरकारी रेडिओ प्रसारण आणि व्यावसायिक रेडिओपासून वेगळा असणारा रेडियो प्रसारणातील महत्त्वाचा तिसरा स्तंभ आहे. कम्युनिटी रेडिओ केंद्रे (सीआरएसएस)ही कमी क्षमतेची रेडिओ केंद्रे असून त्याची स्थापना तसेच परिचालन स्थानिक समुदायांतर्फे होत असते. आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी इत्यादी घटकांच्या संदर्भातील समस्या यांच्याबाबतीत स्थानिक जनतेला असलेल्या समस्या मांडण्यासाठी कम्युनिटी रेडिओ एक मंच पुरवते. तसेच समाजातील वंचित घटकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे एक सशक्त माध्यम झाले आहे. तसेच या रेडिओचे प्रसारण स्थानिक भाषा आणि बोलीमध्ये असल्याने लोकांना या रेडिओला स्वीकारणे सोपे झाले आहे.

कम्युनिटी रेडिओ सेवेमध्ये त्याच्या समग्र दृष्टीकोनासह विकास कार्यांमध्ये लोकांचा सहभाग अधिक मजबूत करण्याची क्षमता देखील आहे. भारतासारख्या देशात प्रत्येक राज्याची वेगळी बोलीभाषा तसेच वेगळी सांस्कृतिक ओळख आहे. अशात सीआरएसएस हे स्थानिक लोकसंगीत आणि सांस्कतिक वारसा जपणारे भांडार म्हणून कार्यरत आहेत. अनेक सीआरएस वंशपरंपरांचे जतन करण्याच्या दृष्टीने स्थानिक गीते रेकॉर्ड करून त्यांचे जतन करून ठेवतात तसेच स्थानिक कलाकारांना त्यांच्या प्रतिभेचे समुदायाला दर्शन घडवण्यासाठीचा मंच उपलब्ध करून देतात. सकारात्मक सामाजिक बदलाचे साधन म्हणून सीआरएसचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान सीआरएसना समुदायाच्या सशक्तीकरणाचे आदर्श साधन बनवते.

Continue reading

आंतरशालेय जंप रोप स्पर्धेत आशनी, योगिता, झाकीर, स्वयंमला सुवर्ण

मुंबईच्या चेंबूर येथील दि ग्रीन एकर स्कूलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात आशनी काळे (लोरोटो कॉन्व्हेट), योगिता सामंत (के. जे. सोमय्या कॉलेज) आणि मुलांच्या याच गटात झाकीर अन्सारी, स्वयंम कांबळे (दोघेही...

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...
Skip to content