Homeचिट चॅटजहाजबांधणीच्या पोलादासाठी तटरक्षक...

जहाजबांधणीच्या पोलादासाठी तटरक्षक दलाने केला सामंजस्य करार

जहाजबांधणीत स्वदेशी भागांच्या वापराला चालना देण्याचा भाग म्हणून देशी बनावटीचे सागरी वापराच्या दर्जाचे पोलाद घेण्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि जिंदाल स्टील अँड पॉवर यांच्यादरम्यान नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

देशहितासाठी करारातील दोन्ही भागीदार स्वदेशीचा वापर वाढवण्यासाठी आवश्यक क्षमताबांधणीसाठी वचनबद्ध राहणार आहेत. देशाच्या संरक्षणाशी संबंधित क्लिष्ट आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सार्वजनिक–खाजगी भागीदारीचे महत्त्व या सामंजस्य कराराने अधोरेखित केले आहे. सरकारी विभाग आणि खाजगी क्षेत्राने एकत्र येण्याची गरज या कराराच्या निमित्ताने समोर आली आहे. दर्जा, श्रेणी, परिमाणे यांसह जहाजबांधणीसाठी वेळोवेळी आवश्यक ठराविक प्रकारच्या पोलादाचा पुरवठा करण्यासाठी निर्दिष्ट पोलादनिर्मिती प्रकल्पांचा या करारात समावेश केला आहे.

भारतीय तटरक्षक दलाचे उपसंचालक (साहित्य व देखभाल), महानिरीक्षक एच. के. शर्मा, जिंदाल स्टील अँड पॉवरचे मुख्य विपणन अधिकारी एस. के. प्रधान यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

Continue reading

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...
Skip to content