Homeएनसर्कलतुतीकोरिन बंदरात 5...

तुतीकोरिन बंदरात 5 कोटींचे चिनी फटाके जप्त!

दीपावलीपूर्वी फटाक्यांची बेकायदेशीर आयात रोखण्याच्या प्रयत्नात करण्यात आलेल्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ या मोहिमेत, तुतीकोरिन बंदरात चाळीस फुटाचे दोन कंटेनर पकडले. या कंटेनरमध्ये 83,520 चिनी फटाके असल्याचे आढळून आले. अभियांत्रिकी वस्तू म्हणून ते पाठवण्यात येत होते. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत साधारण 5 कोटी रुपये आहे. सिलिकॉन सीलंट गनच्या कव्हर कार्गोसह हा साठा जप्त करण्यात आला आहे.

14 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी तुतीकोरिन येथे आयातदाराला अटक केली. पुढील तपासानुसार, चेन्नई आणि तुतीकोरिन येथून आणखी तीन व्यक्तींना ( दोन मुंबईतील) अटक करण्यात आली आहे. सर्व चार आरोपींना या तस्करी प्रकरणात त्यांच्या संशयित भूमिकेसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

फटाक्यांची आयात ही परराष्ट्र व्यापार धोरणातील आयटीसी (एचएस) वर्गीकरणानुसार प्रतिबंधित असून यासाठी विदेश व्यापार महासंचालनालय आणि पेट्रोलियम आणि खोटके सुरक्षा संस्था यांच्याकडून स्फोटक नियम, 2008 अंतर्गत परवाना घेणे आवश्यक आहे. अशी बेकायदेशीर आयात आणि खोटी बतावणी केवळ परराष्ट्र व्यापार आणि सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन नाही तर फटाक्यांच्या अत्यंत ज्वलनशील स्वरूपामुळे सार्वजनिक सुरक्षा आणि बंदराच्या पायाभूत सुविधांना गंभीर धोका निर्माण करते. त्यामुळे फटाक्यांच्या तस्करीवर महसूल गुप्तचर संचालनालय बारकाईने लक्ष ठेवून असते.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content