Homeचिट चॅटलष्कराचे दक्षिण विभाग...

लष्कराचे दक्षिण विभाग प्रमुख प्रथमच नेपाळ दौऱ्यावर!

लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए के सिंह AVSM, YSM, SM, VSM  सात दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पहिल्या नेपाळ भेटीदरम्यान त्यांनी काठमांडू येथील भारतीय दूतावासाला नुकतीच भेट दिली. लेफ्ट. जनरल सिंह यांनी राजदूत नवीन श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधला आणि परस्पर हिताच्या मुद्यांवर चर्चा केली.

लेफ्टनंट जनरल ए के सिंह यांनी काठमांडू येथील भारतीय दूतावासातील संरक्षण विभागालादेखील भेट दिली. या भेटीत त्यांना निवृत्तीवेतन, कल्याण, माजी सैनिक अंशदायी आरोग्य सेवा योजना (ईसीएचएस) तसेच नेपाळचे रहिवासी असलेल्या निवृत्त गोरखा सैनिकांचे तसेच त्यांच्या नातेवाईकांचे दस्तऐवजीकरण या सर्व बाबतीत  माहिती देण्यात आली. लेफ्ट. जन सिंह यांनी काठमांडू येथील भारतीय दूतावासातील अभिलेख कक्ष येथे निवृत्त सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांशी संवाद साधला तसेच नेपाळचे रहिवासी असलेल्या गोरखा सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या संरक्षण शाखेच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content