Monday, March 10, 2025
Homeकल्चर +मुख्यमंत्री फडणवीस यांनी...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले ‘सुनबाई लय भारी’चे पोस्टर लाँच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “सुनबाई लय भारी” या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच लाँच केले. महिला सबलीकरणावर आधारित गोवर्धन दोलताडे निर्मित व शिवाजी दोलताडे दिग्दर्शित हा नवा चित्रपट आहे. मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू करण्यात येणार आहे.

सोनाई फिल्म क्रिएशनतर्फे “सुनबाई लय भारी” या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रपटाच्या पोस्टर लाँचवेळी चित्रपटाचे लेखक, निर्माते गोवर्धन दोलताडे, अभिनेते रोहन पाटील, आमदार तुकाराम बिडकर उपस्थित होते. चित्रपटाचे सहनिर्माते कार्तिक दोलताडे पाटील आहेत. महिला सक्षमीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. शिक्षण आणि आरोग्यसेवा यासारख्या काही क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली असली तरी, भारतातील महिलांना अजूनही पूर्ण सक्षमीकरणात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सक्षमीकरण म्हणजे महिलांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली साधने देणे इतकेच नाही; तर त्यामध्ये त्यांना मागे ठेवणाऱ्या सामाजिक संरचनांना आव्हान देणे आणि बदलणेदेखील समाविष्ट आहे. महिला सबलीकरणासह महिलांवरील अत्याचार थांबवणे, कमी पाठबळ असूनसुदधा कौशल्याच्या जोरावर उत्तुंग भरारी मारणे, सर्वसामान्य महिलांनी उद्योग व्यवसायात भरारी कशी घ्यावी या आशयसूत्रावर “सुनबाई लय भारी” हा चित्रपट बेतला आहे.

“सुनबाई लय भारी” हा चित्रपट समाजातील अनेक महिलांचे प्रश्न सोडवून त्यांना सामाजिक दृष्टीने वरदान ठरणार आहे. चित्रपटात मोठ्या कलाकारांचा समावेश असणार आहे. मात्र सध्या कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

Continue reading

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...

प्रकल्प रद्द करायला मी काही उद्धव ठाकरे नाही!

प्रकल्प स्थगित करायला मी काही उद्धव ठाकरे नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा)चे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील भाषणांना उत्तर देताना फडणवीस बोलत होते. गेल्या काही दिवसांत प्रकल्प...
Skip to content