Homeटॉप स्टोरीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त केंद्र...

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त केंद्र सरकारी कार्यालये अर्धा दिवस बंद!

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेविषयी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली उत्साहाची भावना आणि त्या सोहळ्यात सहभागी होण्याच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने देशातील केंद्र सरकारच्या आस्थापना अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापना दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद राहतील.

अयोध्येत होत असलेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासोबतच त्याच वेळी भारतात आणि परदेशात विविध ठिकाणी विविध संघटना आणि समुदायांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

या संपूर्ण सोहळ्याच्या थेट प्रसारणाची व्यवस्था राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनने केली आहे, जे प्रसारण विविध खाजगी टीव्ही वाहिन्यांवरूनही थेट दाखवले जाणार आहे. अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रसारण मोठ्या पडद्यांवर पाहण्यासाठी भारतात आणि परदेशात सार्वजनिक ठिकाणी देखील व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

Continue reading

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...
Skip to content