Homeडेली पल्सजातीसह जनगणनेची अधिसूचना...

जातीसह जनगणनेची अधिसूचना येत्या 16 जूनला!

भारतातली जातींच्या गणनेसह होणारी जनगणना-2027 दोन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातला एक टप्पा 1 मार्च 2027च्या पहिल्या दिवशी सकाळी 00:00 वाजता मान्य केला जाईल. लडाख तसेच जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील आणि हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमधील असमानकालिक हिमाच्छादित भागांसाठी संदर्भतारीख 1 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 00:00 वाजता असेल. जनगणना कायदा 1948च्या कलम 3च्या तरतुदीनुसार, जनगणना करण्याच्या आशयाची अधिसूचना अंदाजे 16 जून 2025 रोजी राजपत्रात प्रकाशित केली जाईल.

भारताची शेवटची जनगणना 2011मध्ये दोन टप्प्यात करण्यात आली होती. 1) पहिला टप्पा- घरांची यादी (एच एल ओ) (1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2010) आणि (2) दुसरा टप्पा- लोकसंख्येची गणना (पीई) (09 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2011) – पहिल्या मार्च 2011च्या पहिल्या दिवशी 00:00 वाजता या संदर्भ तारखेसह; जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील असमानकालिक हिमाच्छादित क्षेत्रे वगळता, ज्यासाठी ती 11 ते 30 सप्टेंबर 2010दरम्यान आयोजित करण्यात आली होती आणि त्याची संदर्भ तारीख ऑक्टोबर 2010च्या पहिल्या दिवशी 00:00 वाजता होती. याच धर्तीवर 2021ची जनगणनादेखील दोन टप्प्यात करण्याचा प्रस्ताव होता, ज्याप्रमाणे पहिला टप्पा एप्रिल-सप्टेंबर 2020मध्ये आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी 2021मध्ये आयोजित केला जाणार होता. 2021मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण झाली होती आणि काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1 एप्रिल 2020पासून क्षेत्रीय काम सुरू करण्याचे नियोजन होते. पण देशभरात कोविड-19, या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने जनगणनेचे काम पुढे ढकलण्यात आले. ते आता जातगणनेबरोबरच पूर्ण केले जाणार आहे.

Continue reading

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी नोंदवा 31 ऑगस्टपर्यंत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांंसाठी नाट्यसंस्थांकडून येत्या 31 ऑगस्ट, 2025पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती...
Skip to content