एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर २०२२मध्ये शिंदेंबरोबर जाणाऱ्या शिवसेनेतल्या आमदारांना तसेच शिवसैनिकांना रोखण्याकरीता तेव्हाच्या अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची भावनात्मक घोषणा केली. त्यानंतर ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, विधान परिषदेतल्या आमदारकीचा राजीनामा खिशातून बाहेर काढलाच नाही. आता याच न दिलेल्या राजीनाम्याच्या आमदारकीची मुदत येत्या १३ मे रोजी संपणार आहे. त्याआधीचे त्यांचे विधान परिषदेचे हे अखेरचे अधिवेशन सध्या सुरू असून त्याचे शेवटच्या आठवड्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे आज विधान परिषद सभागृहाकडून त्यांना औपचारिक निरोप देण्यात येणार आहे.
एका शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी...
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाशक्तीने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने अक्षरशः फोडली आणि महाराष्ट्रात नवा इतिहास घडला. आता या घटनेला तीन वर्षे लोटली तरी अजूनही फोडाफोडीचे...
पोलीस दल संजूबाबाकडे दिले आहे का? बिष्णोईची चौकशी का नाही? की तो जावई आहे? इंस्टावरील गुन्हेगारी स्वरूपाच्या चाळ्यांना वाचा फोडून अवघे दोन दिवस उलटत...
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते दिल्याने महाविकास आघाडीत ठिणगी पडली. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (उबाठा) याबाबत...
गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्री काही वाचन व गाणी ऐकल्यानंतर इंस्टाग्राम सर्फीग करत होतो. एक दोन रिल्सनंतर एकदम कान टवकारले. आगापिछा नसलेल्या एका क्लिपमधून मुंबईतील...
सपनो का सौदागर, नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी धम्माल उडवून गेला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तेव्हाचे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदींचे घोषवाक्य...
महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे जरी आपले पिताश्री गोपीनाथजींचा वारसा सांगत राजकारण करत असल्यातरी त्यांना गोपीनाथजींची सर नाही हे मी दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते....
मलेशियात झालेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या दुसऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या भारताने यंदादेखील जबरदस्त खेळ करुन जेतेपदाला गवसणी घातली आणि आम्हीच या स्पर्धेचे खरे...
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करण्यात येत असले तरी मूळ हेतू उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नामोहरम करण्याचाच...
महाराष्ट्राच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडू लागली आहेत. दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या एका कृषी प्रदर्शनाच्या मेळाव्यात पंकजाताईंनी जोरदार भाषण ठोकले....