एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर २०२२मध्ये शिंदेंबरोबर जाणाऱ्या शिवसेनेतल्या आमदारांना तसेच शिवसैनिकांना रोखण्याकरीता तेव्हाच्या अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची भावनात्मक घोषणा केली. त्यानंतर ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, विधान परिषदेतल्या आमदारकीचा राजीनामा खिशातून बाहेर काढलाच नाही. आता याच न दिलेल्या राजीनाम्याच्या आमदारकीची मुदत येत्या १३ मे रोजी संपणार आहे. त्याआधीचे त्यांचे विधान परिषदेचे हे अखेरचे अधिवेशन सध्या सुरू असून त्याचे शेवटच्या आठवड्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे आज विधान परिषद सभागृहाकडून त्यांना औपचारिक निरोप देण्यात येणार आहे.
एका शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी...
माध्यमांच्या बाबतीत पत्रकारांविषयी महायुती सरकारचे नेमके धोरण काय ते कळत नाही. देवेन्द्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या सोबतीने महाप्रचंड बहुमत मिळवल्यानंतर शंभर...
केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन तीन फौजदारी कायदे निकालात काढत अस्सल भारतीय असे तीन नवे कायदे तयार केले आहेत. या तीन नव्या कायद्यांची म्हणजेच भारतीय नागरिक...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा आणि व्यंगचित्रकार म्हणून वारसा चालवणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भवितव्य काय असेल, याच्या चर्चा आता रंगू लागल्या...
राज्य विधिमंडळाचे अंदाजपत्रकी अधिवेशन नुकतेच समाप्त झाले. त्यानंतर जनतेला हा प्रश्न पडला की यातून नेमके काय साध्य झाले? खरेतर या अधिवेशनात माथाडी कमगारांसाठीचे महत्त्वपूर्ण...
महाराष्ट्राच्या विधिमंडळात एका कथित विनोदवीराच्या कुजकट करामतींमुळे कामकाज थांबवले जाण्याची वेळ याआधी कधी आली नव्हती, ती या खेपेला आली. उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत...
स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या राजकीय विडंबनामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या कुणाल कामरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता राजकीय विडंबन केले...
संसदेचे अधिवेशन सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची अलिकडच्या काळातील प्रदीर्घ अशी मुलाखत प्रसिद्ध झाली आणि त्याने देशाच्या राजकीय वर्तुळात मोठे तरंग उमटले. तद्वतच राज्याचे...
जिथे क्राईम ब्रँच ब्रांचचा सीनियर इन्स्पेक्टर क्राईम ब्रँचचेच अंग असलेल्या व्हिजिलन्स ब्रँचच्या सीनियर इन्स्पेक्टरविरुद्ध बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू शकतो तिथे पोलीस काहीही करू...
“भावफुलांना पायी उधळून, आयुष्याचा कापूर जाळून...”, अशा शब्दांत वित्त व नियोजन विभाग संभाळणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या 11व्या अंदाजपत्रकी भाषणात सुरूवातीच्या भागातच...