अंतराळ क्षेत्रात वाटचालीत एक नवा अध्याय लिहिण्यासाठी भारत सज्ज झाला असून, पुढच्या महिन्यात भारतीय अंतराळवीराचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम आयोजित होणार आहे. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांषू शुक्ला, ऍक्झियॉम स्पेसच्या एएक्स-4 मोहिमेचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. या अंतराळ मोहिमेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एखादा भारतीय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देईल आणि राकेश शर्मा यांच्या 1984मधील सोवियत सोयुझ अंतराळयानातून झालेल्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेनंतर तब्बल चार दशकांपेक्षा जास्त काळानंतर पहिल्यांदाच भारतीय अंतराळवीर अंतराळात प्रवास करेल.
येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या भावी योजनांचा आढावा घेण्यासाठी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, रविवारी मुंबईतल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी...
आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातल्या एसटीचा प्रवास महागणार आहे. हकिम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ...
थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र,...
संरक्षण मंत्रालयाच्या रिसेटलमेंट झोनने (दक्षिण कमांड) अलीकडेच लष्कर, नौदल आणि हवाई दलातील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स (जेसीओ) आणि निवृत्त अधिकाऱ्यांसाठी (आरओ) म्हणजेच माजी सैनिकांना नवोन्मेष...
पर्यावरण संरक्षणासाठी आता बायोमासआधारित ऊर्जाप्रकल्प ही काळाची गरज असून महाराष्ट्रात सोलापूरला असलेल्या एनटीपीसी प्रकल्पासाठी बांबू बायोमास विकत घेऊन त्याचे कोळशाबरोबर मिश्रण करून जाळण्याचा निर्णय...
राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या समारोहात सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या कॅडेट्सना त्याकरीता खास सराव करावा लागतो. यासाठी सध्या चालू असलेल्या शिबिरात यंदा सहभागी होणाऱ्या...
परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला...
प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तजयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म...
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....