डेली पल्स

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...

राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या...

१ नोव्हेंबर २००५पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन (पेंशन) योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ...

मकरसंक्रातीला महायुतीचे राज्यभर...

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील 11 घटकपक्षांचे येत्या 14 जानेवारी रोजी राज्यभर जिल्हावार मेळावे होणार असल्याची घोषणा भाजपाचे...

नवीन महसूल मंडळांमध्ये...

खरीप हंगाम-2023मध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या 1,021 मंडळांपैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र...

डॉ. अरविंद पनगरिया...

राष्ट्रपतींच्या मान्यतेने भारत सरकारने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 280(1)च्या अधीन राहून सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष आणि कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ....

आता महावितरणची नवीन वीजजोडणी...

कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून  देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे.  त्यामुळे वीजग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नवीन वीजजोडणीसाठीनवीन सेवा जोडणी (NSC) योजनेचा पर्याय ग्राहकांना सर्वप्रथम देण्यात यावा तसेच कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत सेवा देण्यात यावी, असे सक्त निर्देश महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना  देण्यात आले आहे. कृषिपंप वगळून नवीन वीजजोडण्या देण्यासाठी नवीन सेवा जोडणी (New Service Connection - NSC), नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा (Non DDF Consumer Contribution & Refund - CC&RF) तसेच समर्पित वितरण सुविधा (Dedicated Distribution Facility - DDF) अशा तीन योजना अस्तित्वात आहेत. यामध्ये वीजग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी नवीन सेवा जोडणी (NSC) योजना अतिशय महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत नवीन वीजजोडणी देणे किंवा  वीज भार कमी अधिक करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधांची व यंत्रणेची कामेमहावितरणकडून करण्यात येतील. त्यासाठी ग्राहकास कोणताही खर्च करावा लागणार नाही. तर केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल. मात्र राज्यात काही ठिकाणी नवीन सेवा जोडणीच्या पर्यायाची माहिती ग्राहकांना देण्यात येत नसल्याचे  प्रकार समोर आले आहेत. त्याची महावितरणने गंभीर दखल घेत नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये नवीन वीजजोडणीसाठी नवीन सेवा जोडणी (NSC) योजनेचा ग्राहकांना सर्वप्रथम पर्याय देण्यात यावा असे सक्त निर्देश देण्यात आले आहे. तसेच या पायाभूत वीजयंत्रणेची कामे करण्यासाठी निधीची  कोणतीही कमतरता नाही. क्षेत्रीय कार्यालयांनी वीजखांब, वितरण रोहीत्र, स्विच गिअर्स, वीजवाहिन्यांसह आवश्यक साधनसामग्री आपापल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध ठेवावी तसेच ग्राहकांना तात्काळ नवीन  वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत. या योजनेमध्ये वीज भार वाढवण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची कामे सुद्धा अंतर्भूत करण्यात आली आहेत. यासोबतच नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा (CC&RF) योजनेमध्ये अर्जदार ग्राहक स्वतःच्या ...

कृषीसेवक पदभरतीसाठी १६...

राज्यातल्या कृषीसेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आय. बी. पी. एस. कंपनीमार्फत येत्या १६ व १९ जानेवारीला घेण्यात येणार आहे. शासनाच्या  १८ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या...

जहांगीर आर्ट गॅलरीत...

चित्रकार व सुलेखनकार सुभाष जमदाडे यांच्या 'मंत्राक्षरे' आणि चित्रकार सुरेश गोसावी यांच्या 'भक्ती आणि शक्ती' या विषयावरील चित्रकृतींचे एकत्रित प्रदर्शन सध्या मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरी...

आदिवासींच्या न्यायहक्कांसाठी जनजागृती...

देशभरातील 200 जिल्ह्यांमधील 22000 विशेषत: वंचित आदिवासी गट बहुसंख्येने असलेल्या आदिवासी वस्त्या आणि विशेषत: वंचित आदिवासी गटातील कुटुंबांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान,...

‘आयआयसीएफ कंझ्युमर एक्‍स्‍पो’मध्ये...

मुंबईतील सर्वात मोठे इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रदर्शन आयआयसीएफ कंझ्युमर एक्‍स्‍पोच्या घोषणेसह विजय सेल्‍स, ही भारतातील प्रमुख इलेक्‍ट्रॉनिक्‍स ओम्‍नी-चॅनेल रिटेल साखळी तंत्रज्ञानप्रेमी व ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍यास...
Skip to content