बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने मडगाव, गोवा येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलात नुकत्याच आयोजित केलेल्या वेटरन्स मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या श्वेता ठाकूर आणि पल्लवी मित्तल या दोघींनी कांस्यपदकाची कमाई केली.
३५ वर्षांवरील मिश्र दुहेरी वयोगटात श्वेता ठाकूरने अभिनव प्रकाशसोबत कांस्यपदक मिळविले. उपांत्य फेरीत केरळच्या मोहम्मद रेहान व अनिस कौसर यांच्याकडून ठाकूर, प्रकाश जोडीला पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे या गटात रेहान, कौसर हीच जोडी विजेती ठरली. या गटात ६८ जोड्यांनी भाग घेतला होता. श्वेता ठाकूर या उज्ज्वल इंटरनॅशनल कंपनीमध्ये संचालकपदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी आग्रा येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय...
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. धनंजय सावळकर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. नुकताच त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी ते...
ऑस्ट्रेलिया येथे क्वीन्स लँड बॅडमिंटन असोसिएशनने नुकत्याच आयोजित केलेल्या एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी चिन्मय ढवळे,अजय कृष्णन यांनी...
नांदेड येथे नुकत्याच झालेल्या २१व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना ४ सुवर्ण, २ रौप्य, १३ कांस्य अशी...
मुंबईतले बोरिवली हे नवरात्रोत्सवासाठी खूप प्रसिद्ध आहे. बोरिवली येथील कोरा केंद्र मैदानावर दुर्गादेवी नवरात्र उत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या "भक्तिरास नवरात्र महोत्सव 2024"साठी भूमिपूजन,...
मुंबईतल्या पश्चिम महामार्गावर खेरवाडीजवळ असलेला जवळजवळ अर्धा किलोमीटरचा नाला अलीकडे नव्याने बंद करण्यात आला. या नाल्यावर मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली...
श्रीकांत चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ज्युनियर ४८ कॅरमपटूमध्ये उद्या, १४ सप्टेंबर रोजी मुंबईत कांदिवली-पूर्व येथे चुरस होणार आहे. श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व...
बँक ऑफ बडोदा या भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने विलेपार्ले, मुंबई येथे फिजिटल शाखेचे नुकतेच उद्घाटन केले. फिजिटल शाखा ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्वयं-सेवा आणि सहाय्यक सेवा मॉडेल्स एकत्रित करून ग्राहकांच्या अनुभवाची पुनर्परिभाषित करेल. देशात सुरू झालेली बँकेची ही तिसरी फिजिटल शाखा आहे.
बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देबदत्त चंद यांनी बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय व्ही. मुदलियार यांच्या उपस्थितीत या फिजिटल शाखेचे
उद्घाटन केले. बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक मनीष कौरा, सुनीलकुमार शर्मा, महाव्यवस्थापक आणि झोनल हेड, मुंबई झोन, वरिष्ठ बँक अधिकारी आणि झोन आणि विभागातील कर्मचारी सदस्य आणि ग्राहकदेखील उद्घाटनावेळी उपस्थित होते.
बँक ऑफ बडोदाची फिजिटल शाखा व्हिडिओ संपर्क केंद्राने सुसज्ज आहे जिथे ग्राहक गैर-आर्थिक सेवांवर सहाय्य मिळवण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारे बँकेच्या संपर्क केंद्राशी कनेक्ट होऊ शकतो. यात एकसेल्फ सर्व्हिस कियोस्क आहे जिथे टॅबलेट स्थापित केले जातात आणि ग्राहक पॅन नंबर अपडेट, ईमेलद्वारेखाते विवरण, टीडीएस प्रमाणपत्र इत्यादीसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. फिजिटल शाखेत एक विशेष सेवा क्षेत्र तसेच युनिव्हर्सल सर्व्हिस काउंटरदेखील आहेत जेथे अखंड ग्राहकसेवा मिळते. देशभरात प्रायोगिक तत्त्वावर अशाच प्रकारच्या फिजिटल शाखा सुरू करण्याचे बँकेचे लक्ष्य आहे. फिजिटल शाखा ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
येत्या १६ ते २४ सप्टेंबर दरम्यान कर्नाल, हरियाणा येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील ज्युनियर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी मुंबईतल्या भांडूपच्या अवघ्या १४ वर्षीय, नववीत शिकत असलेल्या...