Homeमुंबई स्पेशलमुंबईच्या मालाडमधले डी...

मुंबईच्या मालाडमधले डी मार्ट सील!

मुंबईच्या मालाडमधल्या डी मार्टवर कारवाई करतानाचे हे बोलके चित्र.

मुंबईच्या मालाड (पश्चिम)मधील लिंक रोडवरील ‘डी मार्ट’ स्टोअरमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या पी/उत्तर विभाग कार्यालयाने आज (२४ जुलै २०२१) सील केले.

याप्रकरणी या डिपार्टमेंटल स्टोअरच्या संबंधित व्यवस्थापकाला नोटीस बजावून यासंदर्भात तीन दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.

मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना लागू आहेत. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार या सर्व उपाययोजनांचे व निर्देशांचे पालन काटेकोरपणे करणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या पथकाने आज तपासणी केली. त्यावेळी मालाडच्या लिंक रोडवरील डी मार्ट स्टोअरमध्ये उपाययोजनांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले.

डी मार्टच्या कर्मचाऱ्यांनी, विशेषतः बिल काऊंटरवरील कर्मचाऱ्यांनी मास्क आणि हातमोजे यांचा वापर केलेला नसल्याचे आढळले. तसेच कर्मचारी आणि ग्राहक सर्वजण वावरत असताना सुरक्षित अंतराचे नियम पाळत नसल्याचेही निदर्शनास आले. एकाचवेळी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी करून उपस्थिती नियमाचादेखील तेथे भंग केला गेला. यास डी मार्ट व्यवस्थापन कारणीभूत ठरलेले आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

एकूणच, कोविड प्रतिबंधक नियमांचे योग्यरीत्या पालन होत नसल्याने डी मार्ट, पुढील आदेशापर्यंत बंद (सील) करण्यात आले आहे. डी मार्टच्या संबंधित व्यवस्थापकास नियमभंगाबाबत नोटीस बजावून, परवाना रद्द का करण्यात येऊ नये, ह्याविषयी तीन दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेशदेखील पी/उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिले आहेत.

मालाड

कांदिवलीतील ‘त्या’ ३९०पैकी १५५ नागरिकांनी घेतली खरी लस

कांदिवली (पश्चिम)मध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलात खासगी स्तरावर बनावट कोविड-१९ लसीकरण होऊन फसवणूक झालेल्या नागरिकांना मुंबई महापालिकेकडून अधिकृत लस देण्यास आज प्रारंभ झाला. ह्या ३९० व्यक्तींपैकी १५५ जणांना आज (२४ जुलै २०२१) कांदिवली (पश्चिम)च्या महावीर नगर परिसरातील ऍमिनिटी मार्केट महापालिका लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली. उर्वरित नागरिकांना सोमवारी, २६ जुलै २०२१ रोजी / ते येतील त्यानुसार लस देण्यात येईल, असेही पालिकेकडून सांगण्यात आले.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content