Homeचिट चॅटरक्तदानाचे प्रणेते श्रीधर...

रक्तदानाचे प्रणेते श्रीधर बुधाजी देवलकर सन्मानित

मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करणारे रक्तदान प्रणेते श्रीधर बुधाजी देवलकर यांना ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र जनजागृती ऑनलाईन काव्य स्पर्धा सन्मान नुकताच प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य आणि योगेश वसंत त्रिवेदी यांच्या हस्ते मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय सभागृहात स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येऊन देवलकर यांना सन्मानित करण्यात आले. 

ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन स्वरचित रक्तदान स्पर्धा ‘रक्तदानावर लिहू या काही’ या विषयावर रक्तदान जनजागृती काव्य स्पर्धेत कामगार राज्य विमा योजना रुग्णालय कांदिवली (पूर्व) मुंबई येथील सेवानिवृत्त परंतु आजही या पवित्र कार्यात पूर्णवेळ कार्यरत असलेले रक्तपेढी विभाग तंत्रज्ञ आणि रक्तदान शिबिरांचे विक्रम प्रस्थापित करणारे देवलकर यांनी आपल्या शासकीय रक्तपेढी विभागातील सेवेतील अनुभव असल्याने आणि ते स्वतः कवी असल्याने त्यांनी या रक्तदान जनजागृती स्पर्धेत भाग घेतला.

रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आलेले रुग्ण व गरजवंत रुग्णांना विनामूल्य रक्तकुपींचा पुरवठा करून रुग्णांना जीवनदान मिळण्याकरिता  एक छोटासा प्रयत्न करून रुग्णांना आणि त्यांच्या परिवाराच्या आनंदात आत्मिक समाधान मानणारे देवलकर यांनी रक्तदान स्पर्धेत भाग घेताना स्वरचित कवितेतून रक्तदानाचे महत्त्व सादर केले. त्यांच्या रुग्णसेवेचा वारसा आणि रक्तपेढी विभागातील जनजागृतीचा अनुभव व त्यांची रक्तदान या विषयावरील स्वलिखत कविता ऑनलाईन व्यक्त झाली. या कवितेची दखल घेऊन देवलकर यांना  ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र या संस्थेद्वारे मिळालेले सन्मानचिन्ह, सन्मान पदक, सन्मान पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रंथालयाच्या संजना वारंग उपस्थित होत्या. 

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content