पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार या लोकसभा निवडणुकीत ४००पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने (भाजपा) रणनीती आखली आहे. त्यानुसार प्रत्येक बूथवर 370 मते वाढवण्यासाठी भाजपाने कालपासून राज्यभर सहा दिवसांचे ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य समीर गुरव यांनी याबाबतची माहिती दिली.
या अभियानाचे स्वरूप याप्रमाणे-
समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य.
घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे.
प्रत्येक घर आणि वाहनावर स्टीकर.
लाभार्थींशी नियमित संपर्क.
प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा.
समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठका.
भाजपाविरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्न.
बूथपासून दूरवर राहाणाऱ्या मतदारांना मतदानाचे आवाहन.