Homeचिट चॅटसुलोचना दीदींच्या अस्थिविसर्जनाला...

सुलोचना दीदींच्या अस्थिविसर्जनाला विनोद तावडे हजर!

सुलोचना दीदींच्या कुटुंबियांच्या आग्रहास्तव भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे आज दीदींच्या अस्थिविसर्जनासाठी खास दिल्लीहून मुंबईत येऊन उपस्थित राहिले.

सुलोचना दीदींच्या अस्थींचे दोन कलश केले गेले. एका कलशातील अस्थींचे विसर्जन दीदींची कर्मभूमी राहिलेल्या कोल्हापुरातील नदीत करण्यात आले. आज मुंबईत वरळी येथील समुद्रात दीदींच्या कन्या कांचनताईंच्या हस्ते अस्थी विसर्जित करण्यात आल्या. याप्रसंगी भाजपा नेते विनोद तावडे उपस्थित होते. सुलोचनादीदींच्या कुटुंबियांनी तावडेंचे दीदींशी असणारे घनिष्ट संबंध पाहता त्यांच्या उपस्थितच मुंबईतील अस्थिविसर्जन करण्याचे ठरवले. त्यानुसार विनोद तावडे दिल्लीवरून आज मुंबईत आले व अस्थिविसर्जनादरम्यान उपस्थित राहिले व आपली श्रद्धांजली वाहिली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content