Homeचिट चॅट'व्हॅलेंटाईन डे'निमित्त बिटकॉइन गिफ्ट...

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त बिटकॉइन गिफ्ट कार्ड्सचे पदार्पण

भारतातील प्रमुख क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वझीरएक्स, विशेष व्हॅलेंटाईन डे मोहीम सुरू करण्यास उत्सुक आहे, जे त्याच्या वापरकर्त्यांसाठी प्रेम आणि क्रिप्टो मालकीचा आनंद यांचा अनोखा संगम सादर करत आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे वझीरएक्स गिफ्ट कार्ड्सवर बिटकॉइनचा प्रवेश जो बिटकॉइनची भेट तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसोबत शेअर करण्याचा सुलभ मार्ग आहे.

वझीरएक्स गिफ्ट कार्ड्स वापरकर्त्यांना त्यांच्या जोडीदाराला, कुटुंबाला, मित्रांना किंवा सहकाऱ्यांना सहजतेने WRX आणि BTC क्रिप्टो भेटवस्तू थेट पाठव्णे शक्य करून भेटवस्तू देण्याच्या कलेची नवी व्याख्या बनवतात. सर्व वझीरएक्स वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध असणारे, हे क्रिप्टोची भेट देणे अधिक सहज बनवते.

बिटकॉइन

हा व्हॅलेंटाईन डे आणखी खास बनवण्यासाठी, वझीरएक्स मर्यादित-वेळची खास ऑफर देत आहे. 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत, बिटकॉइन गिफ्ट कार्ड्स उपक्रमात सहभागी होणारे वापरकर्ते 50% कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात, ज्यामध्ये एकूण INR 1 लाख मूल्याच्या WRXच्या बक्षिस पूलमधून कमाल INR 250 WRXपर्यंतचे बक्षिस मिळू शकते.

राजगोपाल मेनन, उपाध्यक्ष, वझीरएक्स म्हणतात की, व्हॅलेंटाईन डेचा संबंध आहे प्रेम व्यक्त करण्याशी, आणि बिटकॉइन गिफ्ट कार्ड्सच्या सहाय्याने वापरकर्ते त्यांच्या प्रियजनांना बिटकॉइनचा परिचय करून देऊ शकतात किंवा त्यांचा विद्यमान पोर्टफोलिओ विचारपूर्वक आणि नाविन्यपूर्ण मार्गाने वृध्दींगत करू शकतात. आम्ही वापरकर्त्यांना या मर्यादित-वेळच्या संधीद्वारे प्रेम आणि आनंद पसरवण्यात भागीदार बनवून हा व्हॅलेंटाईन डे अविस्मरणीय बनवण्यासाठी आमंत्रित करतो.

बिटकॉइन

या मोहिमेबद्दल तसेच त्यात कसे सहभागी व्हावे याबद्दल अधिक तपशीलांसाठी, वापरकर्ते वझीरएक्स ब्लॉगला भेट देऊ शकतात.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content