Wednesday, July 3, 2024
Homeकल्चर +मराठी ओटीटीवर छा...

मराठी ओटीटीवर छा गया भूषण प्रधान..

मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हँडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास, या मराठी ओटीटीवर एका पाठोपाठ एक चित्रपट जोरदार गाजत आहेत.

या मराठी ओटीटीने आजवर भूषण प्रधानचे ‘ऊन सावली’, ‘फेक मॅरेज’ आणि ‘लग्न कल्लोळ’ हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच त्याच्या ‘रंगीत’ या नव्याकोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज, वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळमधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे.

ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे. मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे. आयुष्याला निरर्थक मानून व्यसनाधीन झालेल्या सिद्धार्थची नेमकी काय रहस्यमय गोष्ट आहे, ते रंगीत चित्रपटात पाहता येणार आहे.

आज ओटीटी माध्यम लहानांपासून मोठ्यांपर्यंत घराघरात पोहोचत आहे. अल्ट्रा झकाससारख्या मोठ्या ओटीटीवर माझे सलग चार चित्रपट प्रेक्षक डोक्यावर घेत आहेत. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे, असे मत अभिनेता भूषण प्रधानने व्यक्त केले आहे.

Continue reading

एजंटशी संगनमतः पासपोर्ट खात्यातल्या 14 जणांविरूद्ध गुन्हे

पासपोर्टसाठी अपुरी वा बोगस कागदपत्रे वापरण्यासाठी एजंट वा दलालांबरोबर संगनमत साधल्याच्या प्रकरणी मुंबईतल्या लोअर परळ तसेच मालाडच्या पासपोर्ट ऑफिसमधल्या 14 अधिकाऱ्यांविरूद्ध दाखल केल्यानंतर सीबीआयने आता या प्रकरणात साधारण दीड कोटींची रोकड जप्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयांतर्गत मुंबईतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या लोअर...

राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिक्षकांना 15 जुलैपर्यंत संधी

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024साठी पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन स्व-नामांकन 27 जून 2024पासून शिक्षण मंत्रालयाच्या http://nationalawardstoteachers.education.gov.in या पोर्टलवर मागविण्यास सुरूवात झाली असून ऑनलाईन स्व-नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2024 आहे. यावर्षी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तीन टप्प्यातील निवड प्रक्रियेद्वारे 50 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाईल. राष्ट्रपतींच्या हस्ते येत्या शिक्षकदिनी 5 सप्टेंबर 2024 रोजी विज्ञान...

संयुक्त सरावासाठी भारतीय सैन्य दल थायलंडला

संयुक्त लष्करी सराव 'मैत्री'च्या 13व्या सत्रात भाग घेण्यासाठी भारतीय सैन्य दल नुकतेच थायलंडला रवाना झाले. हा संयुक्त लष्करी सराव थायलंडच्या टाक प्रांतातील वाचिराप्राकन फोर्ट येथे 1 ते 15 जुलैदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. याआधी सप्टेंबर 2019मध्ये मेघालयमधील उमरोई येथे अशाप्रकाचा संयुक्त सराव झाला होता. भारतीय सैन्य...
error: Content is protected !!