Homeमुंबई स्पेशलमुंबईतली भोईवाडा विद्युत...

मुंबईतली भोईवाडा विद्युत दाहिनी एप्रिलपर्यंत बंद!

मुंबई महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील परळ भोईवाडा परिसरात असणाऱ्या भोईवाडा स्मशानभूमीतील दोन्ही ‘विद्युत दाहिनी’चे ‘नैसर्गिक वायू दाहिनी’ (PNG) मध्ये रुपांतरीत करण्यासह संरचनात्मक दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे एप्रिल २०२२पर्यंत भोईवाडा स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी सेवा बंद राहणार आहे. तथापि, भोईवाडा स्मशानभूमीतील पारंपरिक पद्धतीची लाकूड आधारित चिता सेवा सुरू राहणार आहे. तसेच विद्युत दाहिनीसाठी लगतच्या दादर (पश्चिम), शीव, रे रोड स्मशानभूमीचा पर्याय उपलब्ध असल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

भोईवाड्यातील स्मशानभूमीत पूर्वी पारंपारिक पद्धतीनेच लाकडावर आधारित अंत्यसंस्कार होत होते. पर्यावरणपूरक सेवांचा विचार करुन पालिकेने अंदाजे १५ वर्षांपूर्वी तिथे २ विद्युत दाहिन्या सुरू केल्या. अंत्यसंस्कार करण्यासाठी या विद्युत दाहिन्या सकाळपासून सुरू कराव्या लागतात. तसेच धुरांड्यातून धूर थेट बाहेर पडतो. तसेच विद्युत दाहिनीचे संचालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही काही प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व अडथळ्यांचा सखोल अभ्यास करुन अधिक पर्यावरणस्नेही असलेली व नलिकांद्वारे उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक वायू (Pipe Natural Gas) आधारित दाहिनीमध्ये या विद्युत दाहिन्यांचे रुपांतर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला.

यामुळे पर्यावरणाचे रक्षण तर होईलच, सोबत ध्वनिप्रदूषण संपुष्टात येईल. तसेच वीजखर्चात मोठी बचत होणार आहे. त्यासमवेत, स्मशानभूमीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. सदर वायू दाहिनीसाठी महानगर गॅसद्वारे सहज, सुलभरितीने पुरवठा होणार आहे. या नैसर्गिक वायू दाहिनी सेवेमुळे भोईवाडा स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीवर होणारा वार्षिक सुमारे ३० ते ४० लाख रुपयांचा खर्च वाचणार आहे. तसेच देखभालीचा खर्चही कमी होईल. विद्युत दाहिनीच्या तुलनेत वायू दाहिनी अधिक पर्यावरणस्नेही असणार आहे.

भोईवाडा स्मशानभूमीतील वायू दाहिनी उपलब्ध होईपर्यंत, विद्युत दाहिनी आधारित सेवा नजीकच्या तीन स्मशानभूमींमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात चांदणेवाडी हिंदू स्मशानभूमी, चैत्यभूमीजवळ, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), दादर (पश्चिम); शीव येथील शीव हिंदू स्मशानभूमी, शीव रुग्णालय प्रवेशद्वार क्रमांक ७ समोर, भाऊ दाजी मार्ग, शीव आणि रे रोड येथील वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमी, ब्रिटानिया कंपनीसमोर, दारुखाना, रे रोड (पूर्व) यांचा पर्याय उपलब्ध आहे, अशी माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content