Homeचिट चॅटभारती देसाई, गोपाळ...

भारती देसाई, गोपाळ लिंग सन्मानित

भारती देसाई, गोपाळ लिंग यांना “ओम् कबड्डी प्रबोधिनी”ने यंदाचे आपले पुरस्कार जाहीर केले. तेहरान, इराण येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघाचे नेतृत्त्व करून सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या सोनाली शिंगटेचादेखील यावेळी सन्मान करण्यात येईल. स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असेल.

ओम् कबड्डी प्रतिवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ज्यांनी मुंबई, महाराष्ट्राला कबड्डीत दैदिप्यमान यश मिळवून दिले अशा खेळाडूंना सन्मानित करते. त्याचबरोबर त्यांची व त्यांच्या खेळाची नवोदितांना ओळख करून दिली जाते. यंदाचा हा २२वा वर्धापनदिन रविवारी मुंबईतल्या कित्ते भंडारी सभागृह, गोखले रोड, दादर(पश्र्चिम), येथे साजरा करण्यात आला. आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, सचिनभाऊ अहिर, महेश सावंत, माजी महापौर महादेव देवळे, भोईवाडा पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कदम यांच्या उपस्थितीत पुरस्कारविजेत्यांना गौरविण्यात आले.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content