Homeचिट चॅटहिंडन एअरबेसवर होणार...

हिंडन एअरबेसवर होणार ‘भारत ड्रोन शक्ती’चे आयोजन!

मानवरहित यंत्रणेचा वापर करण्याच्या आपल्या समृद्ध अनुभवाचा लाभ घेण्यासाठी, भारतीय हवाई दल, ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियासोबत ‘भारत ड्रोन शक्ती 2023’चे सह-यजमानपद भूषवित आहे. हा उपक्रम 25 आणि 26 सप्टेंबर 2023 रोजी हिंडन (गाझियाबाद) येथील भारतीय हवाईदलाच्या तळावर आयोजित केला जाईल, जिथे भारतीय ड्रोन उद्योगाच्या वतीने हवाई प्रात्यक्षिके होतील.

ड्रोन तंत्रज्ञानामुळे क्षमता वृद्धिंगत झाली असून, जोखीम कमी होत, क्षमतांचा विकास करत नागरी आणि संरक्षण क्षेत्रात क्रांती झाली आहे. भारतात लष्करी-नागरी, या दोन्ही क्षेत्रात ड्रोनचा वापरही वाढत आहे. भारतीय हवाईदल टेहळणीसाठी दूरस्थ पध्दतीने चालवता येणाऱ्या विमानांचा मोठ्या प्रमाणावर वापर करते.

या क्षेत्रातील उदयोन्मुख स्वदेशी क्षमतेचा लाभ मेहेर बाबा स्वर्म ड्रोन स्पर्धेसारख्या उपक्रमांद्वारे घेण्याचे प्रयत्न झाले आहेत. भारतातील ड्रोन्सची डिझाईन आणि विकास क्षमतांवरील विश्वास सिध्द करणाऱ्या या स्पर्धेची पुढील फेरीची तयारी सुरू आहे.

सर्वेक्षण ड्रोन, कृषी ड्रोन, अग्नीशमन ड्रोन, हेवी-लिफ्ट लॉजिस्टिक्स ड्रोन, लोइटरिंग म्युनिशन यंत्रणा, काऊंटर ड्रोन, युद्धसामग्री प्रणाली, ड्रोन स्वॉर्म्स आणि काउंटर-ड्रोन अशी पन्नासहून अधिक थेट हवाई प्रात्यक्षिके ‘भारत ड्रोन शक्ती 2023’ या उपक्रमात सादर केली जातील, ज्यायोगे भारतीय ड्रोन उद्योगाचे सामर्थ्य पूर्ण क्षमतेने प्रदर्शित केले जाईल. यात 75 हून अधिक ड्रोन स्टार्ट-अप आणि कॉर्पोरेट्सचा सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाला केंद्र सरकार, राज्य सरकारांचे विभाग, सार्वजनिक आणि खाजगी उद्योग, सशस्त्र दल, निमलष्करी दल, मित्र देशांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी आणि ड्रोन जिज्ञासू यांच्यासह सुमारे 5,000 लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘भारत ड्रोन शक्ती 2023’हा उपक्रम 2030 पर्यंत देशाला जागतिक ड्रोन क्षेत्रातील महत्वाचे केंद्र बनण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला बळ देईल.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content