Homeडेली पल्ससुपारी, संत्र्यांची माळ...

सुपारी, संत्र्यांची माळ आणि पायऱ्यांवर आंदोलन…

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, दुष्काळग्रस्त भागात निधीवाटप आदी विविध प्रश्न व मागण्यांवर आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गळ्यात सुपारी, संत्र्यांची माळ घालून हे आंदोलन करण्यात आले.

सुपारी, संत्र्यांची माळ गळ्यात घालून आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानभवन परिसरात आगळेवेगळे आंदोलन करून विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. शासन दरबारी मोठया प्रमाणात झगमगाट करत सरकार आपल्या दारी.. हा कार्यक्रम केला जातो. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असताना सरकार खोटी भूमिका घेत आहे. राज्यात मोठया प्रमाणात शेतमजूर व शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या होत असताना हे सरकार संवेदनाहीन झालं असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content