Homeएनसर्कलआणखी पाच वर्षांसाठी...

आणखी पाच वर्षांसाठी वाढवली ‘सिमी’वरील बंदी!

केंद्र सरकारने, काल ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)’ या संघटनेला बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायदा (युएपीए) 1967च्या कलम 3(1) अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित केले आहे. सिमीवर यापूर्वी राजपत्र अधिसूचना क्रमांक एस. ओ. 564(ई)नुसार दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी बंदी घालण्यात आली होती.

सिमी ही संघटना दहशतवादाला प्रोत्साहन देत असून शांतता आणि जातीय सलोखा बिघडवत आहे, हे भारताच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेला बाधा पोहोचवणारे आहे.

बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायदा, 1967सह कायद्याच्या विविध कलमांतर्गत सिमी आणि त्या संघटनेच्या सदस्यांविरुद्ध अनेक गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले आहेत.

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content