Homeएनसर्कलआयुषची कोविड-19 कौन्सिलिंग...

आयुषची कोविड-19 कौन्सिलिंग हेल्पलाईन सुरू

कोविड-19मुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर आयुष आधारित दृष्टीकोन आणि उपाय सुचवणारी समर्पित सामुदायिक सहाय्यता हेल्पलाईन केंद्रीय आयुष मंत्रालयाने कार्यान्वित केली आहे. 14443 असा या हेल्पलाईनचा क्रमांक आहे. संपूर्ण देशभरात आठवड्यातले सातही दिवस सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ही हेल्पलाईन सुरू राहील.

14443 या हेल्पलाईनद्वारे आयुष म्हणजेच आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार, युनानी आणि सिद्ध या विविध उपचार पद्धतीमधले तज्ज्ञ, जनतेचे प्रश्न आणि शंकांचे समाधान करतील. हे तज्ज्ञ मार्गदर्शन आणि उपचार सुचवण्याबरोबरच जवळच्या आयुष सुविधाबाबतही मार्गदर्शन करणार आहेत.

कोविड-19 पश्चात काळजी आणि व्यवस्थापन याबाबतही हे तज्ज्ञ माहिती देतील. आयव्हीआर सुसज्ज असलेली ही हेल्पलाईन सध्या हिंदी आणि इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे. येत्या काळात ती इतर भाषातही उपलब्ध होईल. या हेल्पलाईनवर एकाचवेळी 100 कॉल घेता येतील. आवश्यकतेनुसार भविष्यात ही क्षमता वाढवण्यात येईल.

या हेल्पलाईनच्या माध्यमातून, कोविड-19चा प्रसार रोखण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांना हातभार लावण्याचा आयुष मंत्रालयाचा उद्देश आहे. स्टेप वन या स्वयंसेवी प्रकल्पाचे सहाय्य यासाठी लाभले आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content