Homeटॉप स्टोरीआयइपीएफए आणि डीबीएस...

आयइपीएफए आणि डीबीएस बँक करणार फसव्या योजनांबद्दल जागरूकता

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयइपीएफए) आणि आशिया आणि आग्नेय आशियामधील प्रमुख वित्तीय संस्था, डीबीएस बँक यांच्यातल्या सामंजस्य करारावर काल नवी दिल्लीत स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार, डीबीएस बँकेचे उद्दिष्ट विविध डिजिटल मंचाद्वारे सुरक्षा संदेश प्रसारित करून आयईपीएफएच्या गुंतवणूकदारांमध्‍ये जागरूकता निर्माण करणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देणे आहे.

डीबीएस बँकेच्या देशामध्‍ये 19 राज्यांमध्ये शाखा आहेत तसेच एटीएमचे विस्तृत जाळे आहे. बॅंकेने डिजिटल पायाभूत सुविधा पुरवल्या आहेत. त्‍यांच्या माध्‍यमातून ‘आयइपीएफए’च्या गुंतवणूकदार जागरूकता आणि अंतिम वापरकर्त्यांपर्यंत संरक्षण संदेश पोहोचविण्‍याचे काम चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणावर करणे शक्य होणार आहे.

आयइपीएफए च्या गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रमांमध्‍ये नागरिकांचा सहभाग आण‍ि पोहोच वाढवी आणि प्रतिबद्धता सुनिश्चित करण्यासाठी डीबीएस बँक आपल्या विविध डिजिटल मंचाचा वापर करणार आहे. यामध्‍ये बँकिंग व्यवहारादरम्यान ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एटीएम स्क्रीनवर सुरक्षा संदेश प्रदर्शित करणे आणि तसेच ऑनलाईन व्यवहार केले जात असताना सुरक्षितता संदेश ठळक वैशिष्ट्यांसह प्रसारित करणे. व्हॉट्सॲप आणि इतर संदेश पद्धतीने डीबीएस बँकेच्या शाखांमधील डिजिटल स्क्रीनवर ते संदेश दाखवणे. अधिकाधिक ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आणि डीबीएस बँकेच्या समाजमाध्‍यमांच्या खात्यांवर सुरक्षा संदेश पोस्ट करण्यात येणार आहेत.

यापूर्वी, ‘आयइपीएफए’ने बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय बँकेबरोबर अशा प्रकारचे सामंजस्य करार केले आहेत. ‘आयइपीएफए’ने स्थापनेपासून, आर्थिक साक्षरता वाढवणे आणि आर्थिक फसवणुकीपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी गुंतवणूकदारांना सक्षम करणे या उद्देशाने अनेक गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content