Homeकल्चर +मोदींकडे पुन्हा सत्ता...

मोदींकडे पुन्हा सत्ता देणाऱ्या निवडणुकीचा लेखाजोखा प्रकाशित!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा सत्तेची सूत्रे सोपविणाऱ्या मागच्या म्हणजेच २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीचा लेखाजोखा नुकताच प्रकाशित झाला. ‘सार्वत्रिक निवडणुका २०१९ – अ‍ॅटलस’, नावाचा हा लेखाजोखा मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी राजीव कुमार, अनुप चंद्र पांडे या निवडणूक आयुक्तांसह जारी केला.

या  अभिनव दस्तावेजाचे संकलन केल्याबद्दल आयोगाच्या अधिकाऱ्यांची सुशील चंद्रा यांनी प्रशंसा केली आणि अभ्यासक तसेच संशोधकांना भारतीय निवडणुकांचे व्यापक चित्र उलगडण्यासाठी हा दस्तावेज प्रेरित करेल, असे ते म्हणाले. या अ‍ॅटलसमध्ये निवडणुकीसंदर्भात सर्व डाटा आणि सांख्यिकी तपशील आहे. निवडणुकीसंदर्भात रंजक माहिती, घटना आणि कायदेशीर तरतुदीची माहितीही यामध्ये आहे.

१९५१-५२च्या पहिल्या निवडणुकीपासून आयोग सांख्यिकी आणि विवारणात्मक डाटा असलेले पुस्तक प्रकाशित करत आहे. २०१९मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका या मानवी इतिहासातल्या सर्वात मोठ्या लोकशाही निवडणुका होत्या ज्यामध्ये भारताच्या १०.३७८ लाख मतदान केंद्रांवर ६१.४६८ कोटी मतदार सहभागी झाले.

भारतीय निवडणुकीत, निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडून, मतदारयाद्या तयार करताना आणि निर्वाचन अधिकाऱ्यांकडून निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निवडणूकविषयक डाटा प्रामुख्याने जमा केला जातो. ऑक्टोबर २०१९मध्ये आयोगाने ५४३ लोकसभा मतदारसंघांच्या निर्वाचन अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या निवडणूक डाटावर आधारित सांख्यिकी अहवाल जारी केला. या अ‍ॅटलसमध्ये देण्यात आलेले नकाशे आणि तक्ते यामध्ये ही माहिती दर्शवण्यात आली असून यातून देशाचे निवडणूक वैविध्य जाणण्यासाठी मदत होते.

यामध्ये काही वैशिष्ट्येही नोंदवण्यात आली आहेत. यात, महिला मतदारांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी पुरुष मतदारांपेक्षा जास्त असलेल्या २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातली आकडेवारी देण्यात आली आहे. मतदार, उमेदवार यासह अन्य मापदंडाच्या आधारावर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या लोकसभा मतदारसंघाबाबत यामध्ये माहिती देण्यात आली आहे. विविध वयोगटातले मतदार, मतदारांमध्ये स्त्री-पुरुष प्रमाण यासारखे तुलनात्मक तक्तेही विविध श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

१९५१पासूनच्या सार्वत्रिक निवडणुकात निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या संख्येची तुलनाही या दस्तावेजात करण्यात आली आहे. २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत, देशभरात ११६९२ उमेदवारीअर्ज दाखल झाल्यानंतर अर्ज मागे आणि फेटाळण्यात आल्यानंतर ८०५४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

https://eci.gov.in/ebooks/eci-atlas/index.html इथे हा ई अ‍ॅटलस उपलब्ध असून त्यावर  काही सूचना पाठवल्यास आयोगाच्या इडीएमडी विभागाकडे सामायिक करता येतील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content