Homeकल्चर +'असेन मी.. नसेन...

‘असेन मी.. नसेन मी…’ नाटकाला साडेसात लाखांचे पहिले बक्षिस!

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ३५व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत स्क्रिप्टीज क्रिएशन्स प्रस्तुत ‘असेन मी.. नसेन मी..’ या नाटकाने ७ लाख ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावून गौरव प्राप्त केला आहे. संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी नुकतीच ही घोषणा केली.

मुख्य पारितोषिकविजेती नाटके-

प्रथम पारितोषिक (₹ ७.५० लाख): असेन मी.. नसेन मी… – संस्था: स्क्रिप्टीज क्रिएशन्स

द्वितीय पारितोषिक (₹४.५० लाख): वरवरचे वधुवर – संस्था: कलाकारखाना आणि शांताई

तृतीय पारितोषिक (₹३ लाख): उर्मिलायन – संस्था: सुमुख चित्र

इतर पारितोषिके:

दिग्दर्शन:

प्रथम (₹ १,५०,०००): अमृता सुभाष (असेन मी.. नसेन मी…)

द्वितीय (₹१,००,०००): अद्वैत दादरकर (शिकायला गेलो एक)

तृतीय (₹५०,०००): विराजस कुलकर्णी (वरवरचे वधुवर)

नाट्यलेखन:

प्रथम (₹ १,००,०००): संदेश कुलकर्णी (असेन मी.. नसेन मी…)

द्वितीय (₹ ६०,०००): शेखर ढवळीकर (नकळत सारे घडले)

तृतीय (₹ ४०,०००): सुनिल हरिश्चंद्र व स्मिता दातार (उर्मिलायन)

प्रकाश योजना:

प्रथम (₹ ४०,०००): प्रदीप मुळ्ये (गोष्ट संयुक्त मानापमानाची)

द्वितीय (₹ ३०,०००): शितल तळपदे (मास्टर माईंड)

तृतीय (₹ २०,०००): चेतन ढवळे (उर्मिलायन)

नेपथ्य:

प्रथम (₹ ४०,०००): प्रदीप मुळ्ये (असेन मी.. नसेन मी…)

द्वितीय (₹ ३०,०००): प्रदीप पाटील (वरवरचे वधुवर)

तृतीय (₹ २०,०००): संदेश बेंद्रे (ज्याची त्याची लव्हस्टोरी)

संगीत दिग्दर्शन:

प्रथम (₹ ४०,०००): निषाद गोलांबरे (वरवरचे वधुवर)

द्वितीय (₹ ३०,०००): निनाद म्हैसाळकर (उर्मिलायन)

तृतीय (₹ २०,,०००): साकेत कानिटकर (असेन मी.. नसेन मी…)

वेशभूषा:

प्रथम (₹ ४०,०००):  मयुरा रानडे (गोष्ट संयुक्त मानापमानाची)

द्वितीय (₹ ३०,०००): मंगल केंकरे (सूर्याची पिल्ले)

तृतीय (₹ २०,०००): सुनिल हरिश्चंद्र (उर्मिलायन)

रंगभूषा:

प्रथम (₹ ४०,०००): उदयराज तांगडी (उर्मिलायन)

द्वितीय (₹ ३०,०००): राजेश परब (गोष्ट संयुक्त मानापमानाची)

तृतीय (₹ २०,०००): सुरेंद्र चव्हाण व कौशल तांबे (असेन मी.. नसेन मी…)

उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक व ₹ ५०,०००/-:

पुरुष कलाकार: प्रशांत दामले (शिकायला गेलो एक), ऋषिकेश शेलार (शिकायला गेलो एक), आनंद इंगळे (नकळत सारे घडले), सुव्रत जोशी (वरवरचे वधुवर), ओंकार राऊत (थेट तुमच्या घरातून).

स्त्री कलाकार: निना कुलकर्णी (असेन मी.. नसेन मी…), शुभांगी गोखले (असेन मी.. नसेन मी…), निहारिका राजदत्त (उर्मिलायन), सखी गोखले (वरवरचे वधुवर), शर्मिला शिंदे (ज्याची त्याची लव्हस्टोरी).

६ ते १६ मे २०२५दरम्यान छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर, दादर (प.) येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाटके सादर करण्यात आली. प्रेक्षकांची उदंड उपस्थिती आणि रसिकांची टाळ्यांची पावती यामुळे प्रत्येक प्रयोग गगनभेदी जल्लोषात रंगला. परीक्षक म्हणून विजय गोखले, संजय डहाळे, मिलिंद शिंदे, आशा शेलार आणि लिना भागवत यांनी जबाबदारी पार पाडली. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विजेत्या कलाकारांचे अभिनंदन केले. ह्या स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून राकेश तळगावकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content