Homeडेली पल्सअरुणाचल आणि सिक्कीम...

अरुणाचल आणि सिक्कीम विधानसभेची मतमोजणी 2 जूनला

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता ही मतमोजणी 4 जूनऐवजी 2 जूनला होणार आहे.

निवडणूक आयोगाने 16 मार्चला लोकसभा निवडणुकीसोबत आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही जाहीर केल्या. त्यात अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या दोन्ही राज्यांमध्ये मतदान 19 एप्रिल 2024 रोजी आणि मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र भारताच्या राज्यघटनेच्या 172(1) कलमासोबत कलम 324 आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951ने प्रदान केलेल्या अधिकारानुसार निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी निवडणूक घ्यायची आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही विधानसभांचा कार्यकाळ 2 जून 2024ला संपत आहे. ही बाब विचारात घेता निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

अरुणाचल प्रदेश

हा बदल पुढीलप्रमाणे-

अनुक्रमांक.निवडणूक कार्यक्रमसध्याचे वेळापत्रकसुधारित वेळापत्रक
1मतमोजणीची तारीख4 जून, 2024(मंगळवार)2 जून 2024 (रविवार)
2निवडणूक ज्यापूर्वी पूर्ण होणार आहे ती तारीख6 जून, 2024(गुरुवार)2 जून, 2024(रविवार)

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content