Sunday, December 22, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटतुम्ही सर्वोत्तम जीवन...

तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का?

तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का? तुम्ही तुमच्या उद्देशाच्या दिशेने यात्रा करत आहात की त्यापासून दूर जात आहात? तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात ते तसंच चालू ठेवून तुम्हाला स्वतःविषयीची हीच कथा चालू ठेवायची आहे की तुम्हाला वेगळ्या भवितव्याची अपेक्षा आहे?, असा सवाल केला आहे ‘द ग्रेटनेस माईंडसेट’ म्हणजेच महानतेची मानसिकता…, या पुस्तकाचे लेखक लुईस होवेस यांनी.

लुईस होवेस या न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर लेखकाने त्यांच्या अभ्यासाअंती हे पुस्तक लिहिलं आहे, ज्यामध्ये आपल्या भूतकाळावर मात करून आपलं भविष्य अधिक शक्तिशाली आणि समृद्ध कसं करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं आहे. वैयक्तिक अनुभव, शास्त्रशुद्ध धोरणे आणि जगप्रसिद्ध व यशस्वी लोकांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही सहजतेने पुढील गोष्टी करू शकाल: तुम्ही तुमचं अर्थपूर्ण मिशन ठरवून तुमच्या जीवनाच्या उद्देशाच्या दिशेने वाटचाल करू शकाल. तुमच्यामधील आत्मशंकेमागील खरं कारण काय आहे हे शोधून तुम्हाला मागे खेचणाऱ्या गोष्टींवर मात करू शकाल. स्वतःला निराश करणाऱ्या विचारांपासून मुक्त होऊन तुम्ही समृद्ध जीवन जगायला सुरुवात कराल. तुमच्यामधील महानतेला साध्य करून तुमच्या भोवतालच्या लोकांवर तुम्ही सकारात्मक परिणाम घडवू शकाल. या पुस्तकातील धडे आणि धोरणे अंमलात आणून तुम्ही महानतेच्या मानसिकतेच्या आधारे तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणू शकाल. आजच तुमच्या मनातील शक्तीला जागृत करा आणि आजपासूनच महान आयुष्य जगायला सुरुवात करा.

‘द ग्रेटनेस माईंडसेट’, या पुस्तकाचा अनुवाद केला आहे प्रसाद ढापरे यांनी.

पुस्तकः ‘द ग्रेटनेस माईंडसेट’

पृष्ठे: ३२० किंमत: ३२५ ₹

दुसरे पुस्तक आहे ‘संवादकौशल्य आणि ऐकण्याची कला’. या पुस्तकात दिलेली साधी सोपी कौशल्ये आत्मसात केलीत तर तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्तीशी मैत्री करू शकता. लेखक पॅट्रिक किंग यांनी या पुस्तकात म्हटले आहे की, आजच्या काळात ऐकण्याची कला ही एक महाशक्ती आहे. कुठलंही नातं; मग ते वैयक्तिक असो वा व्यावसायिक, जर आपल्याला घट्ट करायचं असेल, त्यात सुसंवाद आणायचा असेल तर समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. पण ते नुसतंच ऐकून चालत नाही तर एका विशिष्ट पद्धतीने ऐकावं लागतं. ते कसं? हे या पुस्तकातून तुम्हाला कळेल.

या पुस्तकात तुम्हाला कळेल की, लोक तुमच्याशी मनमोकळेपणाने का संवाद साधतील? संवादामध्ये बॉडी लँग्वेज, आवाजाचा टोन… यांचे महत्त्व. ऐकण्याच्या विविध शैली आणि त्या कशा वापराव्यात? तुम्ही ‘शिफ्ट रिस्पॉन्स’ देणाऱ्यांमध्ये मोडता की ‘सपोर्ट रिस्पॉन्स’ देणाऱ्यांमध्ये? ऐकण्याचे पाच स्तर.. भावनात्मक प्रतिभा (इमोशनल इंटेलिजन्स).

पुस्तकः संवादकौशल्य आणि ऐकण्याची कला

पाने: १६० किंमत: २२५ ₹ 

मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ही दोन्ही पुस्तके दसरा ते दिवाळी सवलत योजनेखाली २५ टक्के सवलतीत मिळणार आहेत.

या दोन पुस्तकांची एकूण किंमत- ५५० ₹. सवलतीत- ४५० ₹.

जीवन

पुस्तक खरेदीसाठी संपर्क- ग्रंथ संवाद वितरण (8383888148)

Continue reading

अभ्यासपूर्ण आणि खळबळजनक आहे कुतुब मिनारचा इतिहास! 

हल्ली टीव्हीवर कुतुब मिनारवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काय आहे कुतुब मिनारचे सत्य? भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी छायाचित्रांच्या पुराव्यासह कुतुब मिनारचा खरा इतिहास सांगितला आहे. त्यांनीच लिहिलेल्या या पुस्तकामागची भूमिका...

श्री महालक्ष्मीचा महिमा सांगणारी ‘नारायणी’..

नारायणी, हा लेखक किशोर दीक्षित यांनी लिहिलेला लघुग्रंथ नुकताच हाती पडला आणि जाणून घेतले त्याविषयी.. आद्यन्तरहितेदेवी ह्यादिशक्ती खगोचरे।  योगिनी योगसंभूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।  लेखक किशोर दीक्षित आपल्या मनोगतात लिहितात- आज 'नारायणी' हा लघुग्रंथ आपल्या हाती देताना मनास खूप आनंद व समाधान वाटत...

जाणून घ्या इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा!

इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा, हे लेखक सुरेश नाईक यांचे विज्ञान पुस्तक. सचित्र वाचनीय असलेले हे पुस्तक  आर्ट पेपरवर छापलेले आहे. लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. त्यातील काही भाग इथे देत आहोत. 'चंद्रयान-३'चे यश अतिशय गौरवास्पद होते आहे. याची...
Skip to content