लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या ११ मतदारसंघात काल सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. अंतीम टक्केवारीत आणखी तीन ते चार टक्के मतांची भर पडण्याची शक्यता आहे.
नंदुरबारमध्ये ६७.१२, जळगावात ५३.६५, रावेरमध्ये ६१.३६, जालन्यात ६८.३०, औरंगाबादमध्ये ६०.७३, मावळमध्ये ५२.९०, पुण्यात ५१.२५, शिरूरमध्ये ५१.४६, अहमदनगरमध्ये ६२.७६, शिर्डीत ६१.१३ तर बीडमध्ये ६९.७४ टक्के मतदान झाले.
सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान
चौथ्या टप्प्यात काल सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झाले. सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ८.४३, जळगावमध्ये ६.१४, रावेरमध्ये ७.१४, जालन्यात ६.८८, औरंगाबादमध्ये ७.५२, मावळमध्ये ५.३८, पुण्यात ६.६१, शिरूरमध्ये ४.९७, अहमदनगरमध्ये ५.१३, शिर्डीत ६.८३ तर बीडमध्ये ६.७२ टक्के मतदान झाले.
सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान
११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये २२.१२, जळगावमध्ये १६.८९, रावेरमध्ये १९.०३, जालनामध्ये २१.३५, औरंगाबादमध्ये १९.५३, मावळमध्ये १४.८७, पुण्यात १६.१६, शिरूरमध्ये १४.५१, अहमदनगरमध्ये १४.७४, शिर्डीत १८.९१ तर बीडमध्ये १६.६२ टक्के मतदान झाले.
दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान
दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ३७.३३, जळगावमध्ये ३१.७०, रावेरमध्ये ३२.०२, जालन्यात ३४.४२, औरंगाबादमध्ये ३२.३७, मावळमध्ये २७.१४, पुण्यात २६.४८, शिरूरमध्ये २६.६२, अहमदनगरमध्ये २९.४५, शिर्डीत ३०.४९ तर बीडमध्ये ३३.६५ टक्के मतदान झाले.
दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.३५ टक्के मतदान
दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ४९.९१, जळगावमध्ये ४२.१५, रावेरमध्ये ४५.२६, जालनामध्ये ४७.५१, औरंगाबादमध्ये ४३.७६, मावळमध्ये ३६.५४, पुण्यात ३५.६१, शिरूरमध्ये ३६.४३, अहमदनगरमध्ये ४१.३५, शिर्डीत ४४.८७ तर बीडमध्ये ४६.४९ टक्के मतदान झाले.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदान
सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ६०.६०, जळगावात ५१.९८, रावेरमध्ये ५५.३६, जालन्यात ५८.८५, औरंगाबादमध्ये ५४.०२, मावळमध्ये ४६.०३, पुण्यात ४४.९०, शिरूरमध्ये ४३.८९, अहमदनगरमध्ये ५३.२७, शिर्डीत ५२.२७ तर बीडमध्ये ५८.२१ टक्के मतदान झाले.