Homeचिट चॅट 'TGT आणि वसतिगृह...

 ‘TGT आणि वसतिगृह वॉर्डन’ पदांसाठी अर्ज करा १८ ऑगस्टपर्यंत!

नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स (नेस्टस) ही आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी (इएमआरएस) साठी ही संस्था शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी भरती मोहीम राबवत आहे. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) आणि वसतिगृह वॉर्डन पदासाठीच्या 6329 रिक्त जागा भरण्यासाठी इएमआरएस कर्मचारी निवड परीक्षेची (इएसएसइ)-2023 अधिसूचना नेस्टसने जारी केली आहे. यामुळे एकलव्य शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी दर्जेदार मनुष्यबळाचा समावेश केला जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया 19.07.2023 पासून सुरू झाली आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) समन्वयाने नेस्टस खाली दिलेल्या तक्त्यातील टीजीटी आणि वसतिगृह वॉर्डनच्या रिक्त जागा भरण्यासाठी “ओएमआर आधारित (पेन-पेपर)” मोडमध्ये ईएसएसई-2023 आयोजित करत आहे. :

PostVacancies
TGT5660
Hostel Warden669
Total6329

ऑनलाइन अर्जांची तपशीलवार प्रक्रिया, पात्रता निकष आणि प्रत्येक पदासाठी अभ्यासक्रमासह इतर तपशील emrs.tribal.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ईएमआरएस मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 18 ऑगस्ट 2023 पर्यंत या पोर्टलवर अर्ज दाखल करता येतील.

निवासी संकुलात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाची एकलव्य ही एक प्रमुख योजना आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content