Homeएनसर्कलशिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भरतीसाठी...

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा ३१ जुलैपर्यंत!

आदिवासी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शिक्षण संस्था(NESTS) ही आदिवासी मंत्रालयांतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था असून शिक्षक आणि बिगर-शिक्षक कर्मचाऱ्यांची 4062 पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. नेस्ट्स ने अलीकडेच 4062 पदे भरण्यासाठी ईएमआरएस स्टाफ सिलेक्शन परीक्षा (ESSE)-2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. यामुळे ‘ईएमआरएस’ मध्ये दर्जेदार मनुष्यबळ नियुक्त करून ‘ईएमआरएस’ च्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा होईल. यासाठी 30-6-2023 पासून आवेदनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सीबीएसईच्या समन्वयाने नेस्ट्स ESSE-2023 या परीक्षेचे ओएमआर आधारित(पेन-पेपर) प्रकाराने खालील शिक्षक आणि बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आयोजन करत आहे. 

पदाचे नावसंख्या
प्राचार्य303
पीजीटी2266
लेखापाल361
कनिष्ठ सहायक सचिव  (JSA)759
लॅब अटेंडंट373
एकूण4062

प्रत्येक पदासाठी ऑनलाईन अर्जाची सविस्तर प्रक्रिया, पात्रतेचे निकष आणि अभ्यासक्रमासह इतर सर्व तपशील  emrs.tribal.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.  

राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील  ‘ईएमआरएस’ मधील रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी हे पोर्टल 30.06.2023 ते 31.07.2023 या दरम्यान खुले आहे. 50% किंवा त्यापेक्षा जास्त किंवा 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त आदिवासी असलेल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी समुदायाच्या लोकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी मंत्रालयाचा ईएमआरएस हा एक अग्रणी उपक्रम आहे.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content