Homeचिट चॅटशरद पवार इन्स्पायर...

शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा गौरव म्हणून मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने शरद पवार इन्स्पायर फेलोशिप सुरू करण्यात आली आहे.

कृषी, साहित्य, शिक्षण या क्षेत्रातील गुणवतांनी भविष्यातील नेतृत्त्वासाठी प्रेरित व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. www.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावरील तपशीलानुसार कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी १२ ऑक्टोबर २०२२पर्यंत ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करता येतील.

यानंतर ३ नोव्हेंबर २०२२पर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण होऊन कृषी फेलोशिपसाठी ८०, साहित्य फेलोशिपसाठी १० तर शिक्षण फेलोशिपसाठी ३० अशा एकूण १३० जणांची निवड ही निवड समितीच्या वतीने करण्यात येईल आणि त्याची घोषणा ११ नोव्हेंबर २०२२ यादिवशी करण्यात येईल. त्यांना १२ डिसेंबर २०२२ रोजी शानदार सोहळ्यात फेलोशिप प्रदान करण्यात येईल.

तिन्ही फेलोशिपचे वार्षिक वेळापत्रक वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांचे तर शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाऊंडेशन व विवेक सावंत यांचे सहकार्य मिळत आहे. अधिकाधिक जणांनी या फेलोशिपसाठी अर्ज करावेत, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

1 COMMENT

  1. भाषा बदलत नाही.
    फोटोत प्रतिष्ठानचे बोधचिन्ह व नामनिर्देश नाही.
    सहस्त्रचंद्र म्हणजे नेमके काय?
    Kiranhegdelive चे धेय्य व उद्देश स्पष्ट होत नाहीत!

Comments are closed.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content