Homeचिट चॅटमहिला समुपदेशन केंद्र...

महिला समुपदेशन केंद्र चालविण्यासाठी करा अर्ज!

महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येत्या पंधरा दिवसात कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात अर्ज करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी  यांनी केले आहे.

त्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :- अर्जदार संस्था मुंबई उपनगर जिल्हयातील (स्थानिक) तसेच महिला पदाधिकारी असल्यास प्रथम प्राधान्य असेल., संस्था नोंदणी अधिनियम १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे., संस्थेस किमान ३ वर्षांचा महिला समुपदेश क्षेत्रातील अनुभव आवश्यक जास्त अनुभव असल्यास प्राधान्य., समुपदेशनासाठी एमएसडब्ल्यू (MSW) उत्तीर्ण दोन समुपदेशक कर्मचारी यांची यादी व कागदपत्र जोडणे आवश्यक आहे., संस्थेची घटना व नियमावली आवश्यक ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवणे हा उददेश असावा, सनदी लेखापालांची स्वाक्षरी असलेला मागील तीन वर्षांचा अहवाल (ऑडीट रिपोर्ट ), संस्थेचे मागील तीन महिन्यांचे माहिना निहाय बँक स्टेटमेंट जोडावे., संस्थेचे कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यादी जोडावी, संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत तसेच कोणीही सदस्य शांसकीय सेवेत नाहीत याबाबतचे हमीपत्र सोबत जोडावे., संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. आवश्यक, संस्थेच्या पदाधिकारी (अध्यक्ष व सचिव) यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे विना दुराचार प्रमाणपत्र जोडावे., ज्या स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव आवश्यक आहे. (सोबत आवश्यक ती कागदपत्रे पुरावा म्हणून जोडावेत.) असे मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच. नागरगोजे यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content