Homeचिट चॅटशिखर सावरकर पुरस्कार...

शिखर सावरकर पुरस्कार २०२१ साठी आवाहन

मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने २०२१च्या शिखर सावरकर पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्ती आणि संघटना यांच्याकडून अर्ज मागविले आहेत.

शिखर सावरकर पुरस्कार सोहळ्याचे २०२१, हे दुसरे वर्ष आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही गिर्यारोहणात राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः हिमालयीन विभागात अतुलनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ भारतीय दिग्गजांकरीता एक जीवनगौरव, सह्याद्री विभागात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उत्कृष्ट साहसी गिर्यारोहकाकरीता एक वैयक्तिक आणि सह्याद्री विभागातच उत्कृष्ट साहसाबरोबरच इतर पूरक कामासाठी एक सांघिक अर्थात् संस्थात्मक स्तरावर दिला जाणारा असे मिळून तीन पुरस्कार दिले जाणार आहेत.

त्यापैकी जीवनगौरव पुरस्काराकरीता आवेदनपत्र मागविले जात नाही. स्मारकाच्या निवड समितीमार्फत याबाबतचे संपूर्ण कामकाज पाहिले जाते. वैयक्तिक आणि सांघिक पुरस्कारांकरीता योग्य मार्गाने व योग्य कालमर्यादेत प्राप्त आवेदनपत्रांमधूनच संभाव्य पुरस्कारार्थ्यांची निवड केली जाते. यामध्ये मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि आकर्षक धनराशी यांचा समावेश आहे. पुरस्कारांच्या संपूर्ण प्रक्रियेत निवड समितीसह स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.

२०१५ हे वर्ष स्वातंत्र्यवीरांच्या पवित्र आत्मार्पणाचे ५०वे वर्ष होते. साहसाशी असलेला त्यांचा अनन्यसाधारण असा घनिष्ठ संबंध लक्षात घेऊनच सावरकर स्मारकाने तेव्हा एका राष्ट्राभिमानी हिमालयीन मोहिमेचे आयोजन केले होते. अशा भव्य आणि महत्त्वाकांक्षी मोहिमेकरीता ७ निष्णात गिर्यारोहकांची देशभरातून निवड करण्यात आली होती. तेव्हा अनेक अडचणींवर मात करत स्मारकाच्या या पथकाने २३ ऑगस्ट २०१५ या दिवशी हिमाचल प्रदेशात कर्चानाला परिसरातील एका अजिंक्य, अनामिक हिमशिखराला सर केले आणि त्याद्वारे  स्वातंत्र्यवीरांना ५०व्या आत्मार्पण वर्षानिमित्त एक अविस्मरणीय साहसी मानवंदना दिली. याच ऐतिहासिक मोहिमेत यशस्वीरीत्या सर झालेल्या त्यावेळच्या अनाघ्रात, अनामिक हिमशिखरास आज आपण शिखर सावरकर म्हणून ओळखले जाते.

या पुरस्कारांसाठी  साहसप्रिय व्यक्ती आणि मान्यवर संस्था यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, खालील वेबलिंकच्या आधारे संगणकीय आवेदनपत्रे ऑनलाईन भरुन ती त्याच पद्धतीने विनाविलंब आणि विहित मुदतीतच सादर करावयाची आहेत.

वेबलिंक खालीलप्रमाणे आहे.

१) संस्थांकरीता आवेदनपत्राची लिंक. :- https://bit.ly/37bRZRs

२) व्यक्तींकरीता आवेदनपत्राची लिंक :- https://bit.ly/2VmvEOK

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content