“ॲपल”च्या महत्त्वाकांक्षी सीरी ओव्हरहॉल प्रोजेक्टला सॉफ्टवेअर बगचा फटका बसला आहे. त्यामुळे Apple Siri च्या नवीन व्हर्जनला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. आता iOS 18.5 अपडेटसह सुधारित सीरी रोल आऊट होण्याची शक्यता आहे. चॅटजीपीटी आणि गुगलच्या जेमिनीचा AI मार्केटमध्ये बोलबाला होत असताना या एआय शर्यतीत पुनरागमन करण्यासाठी सीरी ओव्हरहॉल हा ॲपलचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट मानला जात आहे.
अभियांत्रिकी समस्या आणि सॉफ्टवेअर बगमुळे ॲपलच्या सीरी ओव्हरहॉलला विलंब होत आहे. iOS 18.5 अपडेट आता मेपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. मूळतः iOS 18.4सह अपेक्षित असलेल्या, सीरीची नवीन वैशिष्ट्ये Appleला ChatGPT आणि Googleच्या Gemini विरुद्ध AI लँडस्केपमध्ये स्पर्धा करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. एप्रिल 2025च्या सुरुवातीलाच त्याच्या लॉन्चिंगची अपेक्षा होती.
Appleने गेल्यावर्षी iOS 18 प्रदर्शित करताना AI द्वारे बूस्टेड Siri चे अपडेट घोषित केले होते. मात्र, आता क्यूपर्टिनोस्थित या टेक जायंटला सीरीच्या ओव्हरहॉलमुळे विविध अभियांत्रिकी समस्या आणि सॉफ्टवेअर बगचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नवीन अपडेट मेपर्यंत किंवा त्यानंतरही पुढे ढकलले जाऊ शकते. अनेक अपडेट्सद्वारे ॲपलने त्याच्या इतर ॲपल इंटेलिजेंस वैशिष्ट्यांची फीचर्स आणण्यात यश मिळवले असले तरी, सीरी ओव्हरहॉल या यादीतून अजूनही मिसिंग असल्याने आयफोन युझर्स नाराज आहेत.
अॅपलसाठी सीरी इतकी महत्त्वाची का?
2011मध्ये Apple iPhones साठी Siri ही डिजिटल असिस्टंट म्हणून सादर करण्यात आली होती आणि तेव्हापासून त्यात वेळोवेळी अनेक अपग्रेड केले गेले आहेत. Apple ने या आधीच्या लेटेस्ट अपडेटद्वारे ChatGPT पेक्षा अचूक अन् जलद सर्च राउट करण्यासाठी महत्त्वाचा सपोर्ट सीरीमध्ये समाविष्ट केला असला तरी, या सतत वाढणाऱ्या AI लँडस्केपमध्ये आयफोनची व्हॉइस असिस्टंट अजून स्पर्धेत जिथे पोहोचायला हवी होती त्या सक्षम लेव्हलपर्यंत गेलेली दिसत नाही.
गेल्या वर्षी जूनमध्ये, ॲपलने सीरीमध्ये तीन प्रमुख अपग्रेडची घोषणा केली होती. या व्हॉइस असिस्टंटला युझर्स डेटा टॅप करून प्रश्नांची अधिक सुसंगत उत्तरे देण्याची आणि कृती करण्याची परवानगी देणे हा त्याचा मुख्य भाग होता. याशिवाय, ॲप्सना अधिक चांगल्याप्रकारे नियंत्रित करण्यास अनुमती देणारी एक नवीन प्रणाली आणणे तसेच मोबाईल युझर्सच्या स्क्रीनवर रिलीव्हंट कंटेंट डिस्प्ले करण्याची क्षमताही नवीन अपडेट्सद्वारे सीरीला मिळणार आहे.
सध्या लीक होणाऱ्या बातम्यांनुसार, iOS 18.4 ची टेस्ट घेणाऱ्या तंत्रज्ञांना असे आढळून आले आहे की, Siri ची नवी फीचर्स अद्याप सातत्याने काम करत नाहीत. iOS 18.4 एप्रिलपर्यंत रिलीज होणार नसले तरी, डेव्हलपर्ससाठी बीटा आवृत्ती पुढील आठवड्यात सुरू होऊ शकते. Appleकडून कदाचित मे महिन्यात iOS 18.5 अपडेटवर सुधारित Siri लाँच केली जाऊ शकते. अर्थात हे अपडेटेड फीचर फक्त नवीनतम आयफोन 16 सीरिज, आयफोन 15 प्रो लाइनअप आणि आगामी आयफोन एसई 4 वर उपलब्ध असेल.