Homeहेल्थ इज वेल्थटीबीवरील उपचारांसाठी पुरेशी...

टीबीवरील उपचारांसाठी पुरेशी औषधे उपलब्ध!

भारतात क्षय (टीबी) प्रतिरोधक औषधांचा तुटवडा असल्याचा काही प्रसारमाध्यमांमध्यांच्या माध्यमांतून होत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे. औषधाला त्वरीत प्रतिसाद देणाऱ्या क्षयरोगावरील उपचारात, 4FDC (आयसोनियाझिड, रिफॅमपिसीन, इथांब्युटोल आणि पायराझिनामाइड) या दोन महिने घेण्याच्या चार औषधांचा समावेश आहे आणि त्यानंतर दोन महिने घेण्यासाठी, 3 FDC (आयसोनियाझिड, रिफॅमपिसीन आणि इथांब्युटोल) या तीन औषधांचा समावेश आहे. ही सर्व औषधे सहा महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी पुरेशा साठ्यासह उपलब्ध आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 साठी या औषधांची खरेदी प्रक्रियादेखील आधीच सुरू करण्यात आली आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

मल्टी ड्रग रेझिस्टंट (एमडीआर) अर्थात बहुऔषधे प्रतिरोधक क्षयाच्या उपचार पद्धतीमध्ये साधारणपणे 4 महिने 7 औषधे (बेडाक्विलिन, लेव्होफ्लॉक्सासिन, क्लोफॅझिमिन, आयसोनियाझिड, इथांब्युटोल, पायराझिनामाइड आणि इथिओनामाइड) आणि त्यानंतर पाच महिन्यांची 4 औषधे (लेव्होफ्लॉक्सासिन, क्लोफॅझिमाइन, क्लोफॅझिमाइन, क्लोफॅझिमिन आणि इथिओनामाइड) यांचा समावेश होतो. औषध प्रतिरोधक क्षय असलेल्या सुमारे 30% व्यक्तींमध्ये सायक्लोसरीन आणि लाइनझोलिड आवश्यक आहे. बहुऔषध प्रतिरोधक क्षयावरील औषधे घेत असलेले रुग्ण एकूण क्षयरोगग्रस्ताच्या केवळ 2.5% आहेत. तथापि, या रुग्णांसाठी देखील औषधांची अजिबात कमतरता नाही, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

राष्ट्रीय क्षय निर्मूलन कार्यक्रम (नॅशनल टीबी एलिमिनेशन प्रोग्राम-NTEP) अंतर्गत केंद्रीय स्तरावर क्षयरोधक औषधे आणि इतर साहित्य यांची, खरेदी-साठवण-साठ्यांची देखभाल आणि वेळेत वितरण, केले जात आहे. दुर्मिळ परिस्थितीत, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विशेष आर्थिक तरतुदींच्या सुविधेचा (बजेट) उपयोग करून मर्यादित कालावधीसाठी स्थानिक पातळीवर काही औषधे खरेदी करण्याची राज्यांना विनंती केली जाते, जेणेकरून  रुग्णांच्या वैयक्तिक देखभालीवर परिणाम होणार नाही.

अशा प्रकारे, NTEP अंतर्गत मॉक्सिफ्लॉक्सासिन 400 मिलीग्रॅम आणि पायरीडॉक्सिन चे 15 महिन्यांहून अधिकचे साठे उपलब्ध आहेत. तसेच, ऑगस्ट 2023 मध्ये डेलामॅनिड 50 मिलीग्रॅम आणि क्लोफाझिमाइन 100 मिलीग्रॅम, या औषधांचे साठे खरेदी करण्यात आले आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवले गेले. या व्यतिरिक्त, 23.09.2023 रोजी अतिरिक्त 8 लाख एवढ्या डेलामॅनिड 50 मिलीग्राम गोळ्यांच्या पुरवठ्यासाठी खरेदी मागणी पत्र (पर्चेस ऑर्डर P.O) जारी करण्यात आले आहे.

वर नमूद केलेल्या साठ्यांव्यतिरिक्त, ऑगस्ट 2023 मध्ये 3 निश्चित मात्रा संयोजन (FDC(P), लाइनझोलिड-600 मिग्रॅ आणि कॅप्सूल सायक्लोसरीन-250 मिग्रॅ च्या पुरवठ्यासाठी खरेदी आदेश जारी करण्यात आले होते. 3 निश्चित मात्रा संयोजन (FDC(P), लाइनझोलिड-600 मिग्रॅ आणि कॅप्सूल सायक्लोसरीन-250 मिग्रॅ साठी पाठवणी पूर्व तपासणी (PDI) अहवाल तसेच 3 निश्चित मात्रा संयोजन (FDC(P) आणि सायक्लोसरीनचे गुणवत्ता चाचणी अहवाल आले आहेत. ही औषधे राज्यांना पाठवली जात आहेत. 25.09.2023 पासून रवानगी आदेश जारी केले जात आहेत.

औषधांचा सध्याचा साठा पुढीलप्रमाणे..

औषधाचे नाव(30.09.2023) राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP(UOM- CAPS/TABS) अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध साठ्याचे प्रमाणटिप्पणी
सायक्लोसरीन – 250 मिग्रॅ2,73,598रवानगी प्रक्रियेत असलेला साठा – 1,49,02,850. गुणवत्ता चाचणी अहवाल आले आहेत. रवानगी आदेश जारी केले जात आहेत
2,73,598 लाइनझोलिड – 600 मिग्रॅ7,69,883रवानगी प्रक्रियेत असलेला साठा – 52,70,870. 23.09.2023 रोजी पुरवठा पूर्व तपासणी (PDI) आयोजित करण्यात आली होती आणि गुणवत्ता चाचणी अहवाल ऑक्टोबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. .
डेलामॅनिड – 50 मिग्रॅ10,31,770अतिरिक्त 50% मात्रा (8.20 लाख गोळ्या) साठी खरेदी आदेश जारी करण्यात आला असून तो ऑक्टोबर-2023 पर्यंत मिळणे अपेक्षित आहे.
क्लोफॅझीमाईन – 100 मिग्रॅ45,26,200खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून पुरवठा सुरू झाला आहे. या व्यतिरिक्त 49.72 लाख गोळ्यांची खरेदी प्रक्रिया सुरू आहे..
मोक्सीफ्लॉक्सासिन – 400 मिग्रॅ2,72,17,061पुरेसा साठा उपलब्ध आहे.
पायरीडॉक्सिन2,72,24,272पुरेसा साठा उपलब्ध आहे

या अत्यावश्यक क्षयरोग विरोधी औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांव्यतिरिक्त, मध्यवर्ती गोदामांपासून ते परिसरातील आरोग्य संस्थांपर्यंत विविध स्तरांवर साठ्याच्या स्थिती जाणून घेण्यासाठी नियमित मूल्यांकन केले जाते. त्यामुळे, संबंधित प्रसारमाध्यमांच्या अहवालांमध्ये नमूद केलेली माहिती केवळ चुकीची आणि दिशाभूल करणारीच नाही, तर देशात उपलब्ध असलेल्या क्षयरोग विरोधी औषधांच्या साठ्याची योग्य स्थितीही दर्शवत नाही, असेही संबंधित मंत्रालयाने म्हटले आहे.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content