Homeचिट चॅट.. आणि वाचले...

.. आणि वाचले श्वानाचे प्राण!

मुंबईतल्या कुर्ला स्थानक येथे रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका श्वानाला वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचवण्यात संबंधितांना यश आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थेने दाखवलेल्या तत्परतेमुळे एका मुक्या जिवाला वेळीच रूग्णालयात दाखल करणे शक्य झाले आणि त्याचे प्राण वाचले.

कुर्ला स्थानक परिसरात काल दोन श्वानांना उपनगरीय रेल्वेने धडक दिल्याने एका श्वानाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या श्वानाला गंभीर दुखापत झाली होती. कुर्ला स्थानकातील उप स्थानक व्यवस्थापक रवी नांदुरकर यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाकडे या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर, पालिकेच्या वतीने मृत अवस्थेतील श्वानाला वाहनातून नेण्यात आले. तसेच स्थानकात जखमी झालेल्या श्वानाला मदत करण्यासाठी देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी तत्काळ वाहन उपलब्ध करून दिले.

पालिकेशी संलग्न असलेल्या बाई सकरबाई दिनशॉ पेटिट ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी स्थानक परिसरात पोहोचून ट्रस्टच्या परळ येथील रूग्णालयात जखमी श्र्वानाला दाखल केले. श्वानाच्या जिवाला निर्माण झालेला धोका वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्यानंतर टळला.

श्वानासाठी संबंधित वैद्यकीय उपचारासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संलग्न संस्थांच्या माध्यमातून मदत करण्यात येते. पालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाकडे १९१६ या क्रमांकावर संपर्क साधून प्राण्यांशी संबंधित वैद्यकीय उपचारासाठी मदत मागण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्राण्यांना नजीकच्या केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पालिकेशी संलग्न आहेत. तसेच सेवाभावी वृत्तीने या संस्थांचे स्वयंसेवक पालिका क्षेत्रात नागरिक व प्राण्यांना मदत करत आहेत. नागरिकांना श्वानांशी संबंधित तक्रारीसाठी ऑनलाईन पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना https://vhd.mcgm.gov.in/register-grievance या लिंकवर तक्रार अथवा सूचना दाखल करता येईल. 

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content