Homeचिट चॅटआनंद, बाळकृष्ण जोडी...

आनंद, बाळकृष्ण जोडी विजेती

बॅडमिंटन असोसिएशन मुंबई उपनगरच्या वतीने नुकत्याच गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे 10 वर्षे वयोगटावरील दुहेरीच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आनंद विठ्ठलकर व बाळकृष्ण पी. एम. यांनी दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

उपांंत्य फेरीत त्यांनी डॉ. झूबेर सोयाथिया, माणिक दारूवाला जोडीचा 21 – 14, 21 -14 असा दोन गेममध्ये सहज पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीमध्ये आनंद, बाळकृष्ण जोडीने  अशोक शर्मा, महेश छाब्रियाचा 21 – 19,  21- 14 दोन गेममध्ये आरामात पराभव करून विजेतेपद संपादन केले. विजेत्या जोडीस रुपये 6000/- चा धनादेश, अविनाश धर्माधिकारी, अध्यक्ष, बॅडमिंटन असोसिएशन मुंबई उपनगर, राखी सोनिग्रा, संयुक्त सचिव गोरेगाव स्पोर्ट्स क्लब यांच्या हस्ते देण्यात आला.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content